IPL 2020, CSK vs DC Match: Delhi's bitter challenge ahead of Chennai; Great performance | IPL 2020, CSK vs DC Match: चेन्नईपुढे दिल्लीचे कडवे आव्हान; शानदार कामगिरी करावी लागणार

IPL 2020, CSK vs DC Match: चेन्नईपुढे दिल्लीचे कडवे आव्हान; शानदार कामगिरी करावी लागणार

शारजाह : चेन्नई सुपरकिंग्सची गाडी पुन्हा रुळावर आली आहे, पण पुढील सामन्यात शनिवारी त्यांना दिल्ली कॅपिटल्सच्या कडव्या आव्हानाला सामोेरे जावे लागणार आहे. चेन्नईला यंदाच्या सत्रातील आशा कायम राखण्यासाठी दिल्लीविरुद्ध शानदार कामगिरी करावी लागेल. चेन्नईची लढत आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्ली संघाविरुद्ध आहे.

चेन्नईकडे धोनीचे कुशल नेतृत्व असून रायुडू, फाफ ड्यूप्लेसिस, शेन वॉटसन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दिल्लीतर्फे द.आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा व ऑनरिख नॉर्खियासह फिरकीपटू आर. अश्विन व अक्षर पटेल प्रभावी कामगिरी करीत आहेत. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020, CSK vs DC Match: Delhi's bitter challenge ahead of Chennai; Great performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.