IPL 2020 : रैना, भज्जी नसले तरी फिकर नॉट; CSKनं पोस्ट केला महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट Video

IPL 2020 : धोनीच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 09:14 PM2020-09-05T21:14:43+5:302020-09-05T21:16:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020 : Chennai Super Kings share fantastic video of MS Dhoni, must watch | IPL 2020 : रैना, भज्जी नसले तरी फिकर नॉट; CSKनं पोस्ट केला महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट Video

IPL 2020 : रैना, भज्जी नसले तरी फिकर नॉट; CSKनं पोस्ट केला महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाला सुरुवात होण्याआधीच माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला (CSK) दोन मोठे धक्के बसले. संघाचा उप कर्णधार सुरेश रैना आणि अनुभवी गोलंदाज हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली. त्यात दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील 11 अशा एकूण 13 सदस्यांना कोरोना झाल्यानं CSKच्या गोटात चिंता निर्माण झाली होती. पण, चेन्नईनं शनिवारी एक व्हिडीओ पोस्ट करून रैना, भज्जी नसले तरी फिकर नॉट, असा संदेशच दिला आहे. CSKनं शनिवारी महेंद्रसिंग धोनीच्या फटकेबाजीचा व्हिडीओ पोस्ट केला.

चेन्नई सुपर किंग्सनं सुरू केला सराव
कोरोना व्हायरसमुळे आयपीएस भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.  दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफच्या सदस्य 14 दिवासांच्या क्वारंटाईन कालावधीत आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य सदस्यांची गुरुवारी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात या सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांनी सरावाला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या दुबईतील केंद्रात चेन्नईच्या खेळाडूंनी सराव केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येनं आयसीसीच्या अकादमीबाहेर गर्दी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते सर्व धोनीच्या नावाचा गजर करत होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच घेतली निवृत्ती
धोनीनं 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.      


माहीची आयपीएलमधील कामगिरी
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं ( 2010, 2011 आणि 2018) तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावली. धोनीनं आयपीएलमध्ये 190 सामने खेळले आणि त्यात त्यानं 42.20 च्या सरासरीनं 4432 धावा केल्या आहेत. नाबाद 84 ही त्याची सर्वोत्तम खेळी असून त्यानं 23 वेळा 50+ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्यानं 297 चौकार व 209 षटकारांसह त्यानं 98 झेल व 38 यष्टीचीत आहेत.

पाहा धोनीचा भन्नाट व्हिडीओ...

 

Web Title: IPL 2020 : Chennai Super Kings share fantastic video of MS Dhoni, must watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.