IPL 2019 : राजस्थानचा पहिला विजय, बंगळुरुचे पराभवाचेच पाढे

बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. या आव्हानाचा सहजपणे यशस्वी पाठलाग राजस्थानने केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 11:14 PM2019-04-02T23:14:56+5:302019-04-02T23:28:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Rajasthan Royals's first win, Royal Challengers Bangalore not yet won single game in ipl | IPL 2019 : राजस्थानचा पहिला विजय, बंगळुरुचे पराभवाचेच पाढे

IPL 2019 : राजस्थानचा पहिला विजय, बंगळुरुचे पराभवाचेच पाढे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, आयपीएल २०१९ : राजस्थान रॉयल्सने आपल्या चौथ्या सामन्यात अखेर पहिल विजय मिळवला. भेदक गोलंदाजी आणि जोस बटलरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने बंगळुरुवर विजय मिळवला. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. या आव्हानाचा सहजपणे यशस्वी पाठलाग राजस्थानने केला. राजस्थानने हा सामना सात विकेट्स राखून जिंकला.

बटलर आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाला चांगील सुरुवात करून दिली. राजस्थानच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे राजस्थानला पाच षटकांमध्ये एकही फलंदाज न गमावता ४६ धावा करता आल्या. अजिंक्यच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. अजिंक्यने २० चेंडूंत २२ धावा केल्या. त्यानंतर बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर जोस बटलरच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. बटलरने ४३ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात आश्वासक झाली नाही. बंगळुरुचा डाव आता कोसळणार असे वाटत असताना पार्थिव पटेलने संघाच्या डावाला आधार दिला. पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरुला राजस्थानपुढे १४९  आव्हान ठेवता आले.

राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बंगळुरुला यावेळी ४९ धावांची सलामी मिळाली आणि त्यांना पहिला धक्का बसला तो विराट कोहलीच्या रुपात. श्रेयस गोपाळने अप्रतिम चेंडू टाकत कोहलीचा मिडल स्टम्प उडवला. कोहलीला २५ डूंत २३ धावा करता आल्या. कोहलीनंतर बंगळुरुने काही फरकाने दोन फलंदाज गमावले. पण या साऱ्या घडामोडी घडत असताना पटेल मात्र संघाची धावगती वाढवण्यासाठी प्रयत्नशील होता. पटेलने यावेळ २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पटेलने ४१ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६७ धावा केल्या.

Web Title: IPL 2019: Rajasthan Royals's first win, Royal Challengers Bangalore not yet won single game in ipl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.