IPL 2019: Catch Me If You Fan, It is impossible to catch MS Dhoni, see the video | IPL 2019 : धोनी को पकडना मुमकिन ही नही नामुमकिन है, पाहा व्हिडीओ

IPL 2019 : धोनी को पकडना मुमकिन ही नही नामुमकिन है, पाहा व्हिडीओ

चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या मोसमाला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याच्या निमित्तान विराट कोलही आणि महेंद्रसिंग धोनी हे आजी-माजी कर्णधार समोरासमोर येणार आहे. भारतीय संघातील धोनीच्या स्थानाबद्दल सध्या उलसुलट चर्चा सुरू असल्या तरी आयपीएलमध्ये धोनीची मोहिनी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्सला सर्वाधिक जेतेपद जिंकून देणाऱ्या धोनीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि याची प्रचिती रविवारी आली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या तयारीसाठी चेन्नईचा संघ मैदानावर दाखल झाला आणि धोनीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमवर चाहत्यांची तौबा गर्दी जमली होती.चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पहिल्या सराव सामना पाहण्यासाठी जवळपास 12000 चाहते आले होते. त्यामुळे धोनी... धोनी नावाच गजर घुमला... सराव सत्रादरम्यान एका चाहत्याने मैदानावर धाव घेतली. त्याने मैदानावर धोनीचा पाठलागच सुरू केला, परंतु हाती येईल तो धोनी कसला. धोनीनेही त्याला चांगलेच चकवले. 
 मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली होती. आयपीएल दरम्यान भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचेहंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. पण, त्यावेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते. 

सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  यात 17 सामने होणार आहेत.
पाहा व्हिडीओ...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2019: Catch Me If You Fan, It is impossible to catch MS Dhoni, see the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.