The Indian women cricketer was asked for match fixes during the series against England | भारताच्या क्रिकेटपटूला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी झाली होती मॅच फिक्सिंगसाठी विचारणा

भारताच्या क्रिकेटपटूला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी झाली होती मॅच फिक्सिंगसाठी विचारणा

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेमध्ये भारताच्या एका क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंसाठी विचारणा करण्यात आली होती. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने सोमवारी याबाबतची माहिती दिली. सोमवारी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने या दोन व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख अजित सिंह शेखावत यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

शेखावत यांनी याबाबत सांगितले की, " आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) या प्रकरणाचा तपास करत आहे. भारताच्या या क्रिकेटपटूने  बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला ही माहिती दिली. त्यामुळे आता या गोष्टीचा तपास योग्यरीतीने होत आहे. या खेळाडूने ही माहिती देून चांगलेच काम केले आहे."

 बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलीसांची मदत मागितली आहे.  बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलीसांना राकेश बाफना आणि जितेंद्र कोठारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगितली आहे. भारतीय महिला संघातील एका क्रिकेटपटूने बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला ही माहिती दिली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The Indian women cricketer was asked for match fixes during the series against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.