ठळक मुद्देभारत-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज तिरुवनंतपूरम येथेरोहित शर्माची बॅट तळपणार की पुन्हा अपयशी ठरणार?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना आज तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. पहिल्या ट्वेंटी-20त विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी जोरदार फटकेबाजी करताना टीम इंडियाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजनं ठेवलेलं 208 धावांचं लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात विराट, राहुल आणि युजवेंद्र चहल यांनी वेगवेगळ्या विक्रमांना गवसणी घातली. विराटनं पहिल्या सामन्यात 50 चेंडूंत नाबाद 94 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील त्याची ही सर्वोत्तम खेळी ठरली. आज होणाऱ्या सामन्यातही विराटला विक्रमाची संधी आहे.

पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 207 धावा केल्या. एव्हिन लुईसनं 17 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 40 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेंडन किंग ( 31), शिमरोन हेटमायर ( 56) आणि किरॉन पोलार्ड ( 37) यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनही 9 चेंडूंत 24 धावा चोपल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला. 


त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (8) लगेच माघारी परतला. पण, राहुल व विराट यांनी शतकी भागीदारी केली. राहुलनं 40 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 62 धावा केल्या. त्यानंतर विराटनं सर्व सूत्र आपल्या हाती घेताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 50 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 94 धावा चोपल्या. 

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर करण्यासाठी विराटला केवळ तीन धावा कराव्या लागणार आहे. सध्या भारतीय संघाचा उप कर्णधार रोहित शर्मा या विक्रमात अव्वल स्थानी आहे. याशिवाय 31 वर्षीय विराट ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारतात 1000 धावांचा पल्ला पार करण्यासाठी 25 धाव दूर आहे. आज कोहली 25 धावा करू शकला तर तो भारतात ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. यापूर्वी तीन फलंदाजांनी एकाच देशात 1000 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

Web Title: India vs West Indies: Virat Kohli eyes record in 2nd T20I against West Indies 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.