अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला समजले जायचे. पण आता धोनीचा विक्रम मोडण्यासाठी कर्णधार विराट कोहली सज्ज झाला आहे. पण धोनीचा नेमका कोणता विक्रम कोहली मोडणार आहे, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

Image result for dhoni with kohli in test

धोनी कर्णधार असताना भारताचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. धोनीने भारताचे नेतृत्व करताना २७ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. कोहलीने आतापर्यंत २६ कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजमधील दोन्ही कसोटी सामने जर भारताने जिंकले तर धोनीचा विक्रम कोहली मोडू शकतो. त्याचबरोबर भारताला सर्वात जास्त कसोटी विजय मिळवून देणारा कर्णधार म्हणूनही कोहली अव्वल क्रमांकावर पोहोचू शकतो. कारण आतापर्यंत धोनीएवढे कसोटी विजय भारताच्या कोणत्याही कर्णधाराला मिळवता आलेले नाहीत.

Related image

कसोटी क्रिकेट आता जास्त रंगतदार होणार; सांगतोय विराट कोहली
सध्याच्या जमाना हा ट्वेन्टी-२० क्रिकेटचा आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे आता कसोटी क्रिकेटला जास्त प्रेक्षक मिळत नसल्याचे म्हटले जाते. पण या गोष्टीला छेद देणारे वक्तव्य भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे आता टेस्ट क्रिकेट अधिक रंगतदार होणार आहे, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.

Related image

याबाबत कोहील म्हणाला की, " कसोटी क्रिकेटचा हा जमाना नाही, ते प्रासंगिक नाही, असे म्हटले जात होते. गेल्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये चुरस वाढली आहे. पण आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे क्रिकेट अधिक रंगतदार होणार आहे. कारण आता स्पर्धा दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामना हा संघांसाठी महत्वाची ठरणार आहे."

Image result for dhoni with kohli in test

रोहितला खेळवायचं की अजिंक्यला, कोहलीपुढे मोठा प्रश्न
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिका काही दिवसांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माला संधी द्यावी की अजिंक्य रहाणेला हा मोठा प्रश्न सध्या कर्णधार विराट कोहलीपुढे आहे. कारण भारतीय संघ जर पाच गोलंदाजांनुसार मैदानात उतरला तर रोहित किंवा अजिंक्य या दोघांपैकी एकालाच पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे कोहलीला रोहित किंवा अजिंक्य यांच्यापैकी एकालाच निवडावे लागणार, असे वाटत आहे.

 नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात अजिंक्यने दमदार अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे अजिंक्य फॉर्मात आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात अजिंक्यला संधी मिळायला हवी, असे काही जणांना वाटत आहे. दुसरीकडे रोहितने आपल्या गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे गेल्या कसोटी सामन्याचा विचार केला तर रोहितला संधी मिळायला हवी, असे काही जणांचे म्हणणे आहे. या साऱ्या गोष्टींमुळे आता कोहलीपुढील समस्या वाढली आहे. आता या दोघांपैकी कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.


Web Title: India vs West Indies Test: Virat Kohli ready to break MS Dhoni's record
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.