India vs West Indies : 'हा' फोटोच सांगतोय ख्रिस गेलची नामक तोफ थंडावली का...

या साऱ्या गोष्टी पाहता गेलचा हा अखेरचा सामना असेल, असे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 09:16 PM2019-08-14T21:16:18+5:302019-08-14T21:28:20+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies: Is this photo just telling Chris Gayle's retirement ... | India vs West Indies : 'हा' फोटोच सांगतोय ख्रिस गेलची नामक तोफ थंडावली का...

India vs West Indies : 'हा' फोटोच सांगतोय ख्रिस गेलची नामक तोफ थंडावली का...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल निवृत्त होणार, असे बरेच जण म्हणत होते. पण गेलने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जर या सामन्यात बाद झाल्यानंतर ख्रिस गेलचा फोटो पाहिला तर त्यामधून त्याच्या निवृत्तीचे संकेत मिळत असल्याचे चाहते म्हणत आहेत.

विश्वचषकाच्यावेळी गेलने आपल्या कारकिर्दीबाबत भाष्य केले होते. पण त्यामधून गेल कधी निवृत्त होणार हे नेमके कळत नव्हते. गेल विश्वचषकाच्या वेळी म्हणाला होता की, "माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मी कदाचित कसोटी मालिका खेळेन. त्यानंतर भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी नक्कीच खेळणार आहे. पण ट्वेन्टी-२० मालिकेत मात्र मी खेळणार नाही."

गेलने हे वक्तव्य केल्यावर मात्र वेस्ट इंडिजच्या प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापक फिलीप स्पुनर यांनी ही गोष्ट अधिक स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, " हो, भारताविरुविरुद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार आहे." पण याबाबत अधिकृत घोषणा गेलने आतापर्यंत केलेली नाही. पण मैदानामध्ये गेल ज्यापद्धतीने वागला ते पाहता त्याचा हा अखेरचा सामना असावा, असे म्हटले जात आहे.

या सामन्यात गेलने ४१ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७२ धावांची तुफानी खेळी साकारली होती. गेलला यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. बाद झाल्यावर गेलने हेल्मेट काढले आणि आपल्या बॅटवर ठेवले. गेलची ही कृती नेमके काय दर्शवते, याचा अंदाज अजूनही काही क्रिकेट चाहत्यांना आलेला नाही. गेल बाद झाल्यावर त्याला कोहली आणि रोहित शर्मा यांनी त्याची गळाभेटही घेतली होती. या साऱ्या गोष्टी पाहता गेलचा हा अखेरचा सामना असेल, असे म्हटले जात आहे.

Web Title: India vs West Indies: Is this photo just telling Chris Gayle's retirement ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.