India vs West Indies : रोहित शर्माने रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा बनला भारताचा पहिला क्रिकेटपटू

रोहितने यावेळी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही पिछाडीवर टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 07:35 PM2019-12-11T19:35:27+5:302019-12-11T19:36:29+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies: History made by Rohit Sharma, 'He' becomes India's first cricketer | India vs West Indies : रोहित शर्माने रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा बनला भारताचा पहिला क्रिकेटपटू

India vs West Indies : रोहित शर्माने रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा बनला भारताचा पहिला क्रिकेटपटू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने इतिहास रचला आहे. रोहितने केलेला पराक्रम आतापर्यंत भारताच्या एकाही फलंदाजाला करता आलेला नाही.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी भारताला दणकेबाज सुरुवात करून दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पाचव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.

रोहितने या सामन्यात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. रोहितने या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याचबरोबर रोहितने या सामन्यात एक इतिहास रचला आहे. रोहितने या सामन्यात आपला ४००वा षटकार लगावला. आतापर्यंत एकाही भारताच्या खेळाडूला ४०० षटकार लगावता आलेले नाहीत.

Image result for rohit sharma in lokmat

रोहित हा भारताकडून ४०० षटकार पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू आहे. सर्वाधिक षटकार  वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहेत. त्याने आतापर्यंत ५३४ षटकार लगावले आहे. या यादीमध्ये दुसरा क्रमांक पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा आहे. त्याच्या नावावर ४७६ षटकार आहेत.

तिसऱ्या सामन्यासाठी संघात कोणाला मिळाले स्थान आणि कोणाला डच्चू
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तिसरा ट्वेन्टी-२० सामना वानखेडेवर सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला आहे. त्यांना नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. नाणेफेकीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यासाठी आपला संघ जाहील केला. यावेळी कोणाला संघात स्थान मिळाले आणि कोणाला डच्चू, ते जाणून घ्या...

या सामन्यात वेस्ट इंडिजने संघात एकही बदल केलेला नाही. गेल्या सामन्यात त्यांना विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या संघात एकही बदल केलेला नाही.

वेस्ट इंडिजने संघात एकही बदल केलेला नसला तरी भारताने मात्र या सामन्यासाठी संघात दोन महत्वाचे बदल केले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघातून रवींद्र जडेजाला डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर फिरकीपटू युजवेंद्र चहलला संघातून काढण्यात आले असून कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलेले आहे.

आपल्या घरच्याच मैदानात हे दोन दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकणार
आपल्या घरच्याच मैदानात दोन दिग्गज खेळाडू आज वानखेडेवर होणाऱ्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कारण हा सामना जो संघ जिंकेल, त्यांना मालिका विजय मिळवता येणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. पण दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर बाजी मारली आणि मालिका १-१ अशी बरोबरी आली. त्यामुळे हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाचे घरचे मैदान आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातील दोन दिग्गज खेळाडू यावेळी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. हे दोन दिग्गज खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि महत्वाचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड.

वानखेडेवर वेस्ट इंडिजला धक्का द्यायला मुंबईचे त्रिकुट सज्ज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा निर्णायक सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. वानखेडेवर वेस्ट इंडिजला धक्का देण्यासाठी मुंबईचे त्रिकुट सज्ज असल्याचेच पाहायला मिळाले.

घरच्या मैदानात खेळाडूंची कामगिरी चागंली होते, असे म्हटले जाते. कारण त्यांना चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळत असतो. या सामन्यात वानखेडेवर भारताकडून तीन खेळाडू उतरतील, असे म्हटले जात आहे.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माला अजूनही या मालिकेत सूर गवसलेला दिसत नाही. कारण या मालिकेत रोहितला एकही मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे घरच्या मैदानात रोहित कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईकर शिवम दुबेने धडाकेबाज अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे आता घरच्या मैदानात तो पुन्हा एकदा तळपणार का, याची उत्सुकता मुंबईकरांना असेल. रोहित आणि शिवम यांच्याबरोबर श्रेयस अय्यरही या सामन्यात खेळण्याची शक्यता आले. त्यामुळे वेस्ट इंडिजला धक्का देण्यासाठी मुंबईचे त्रिकुट सज्ज असल्याचे म्हटले जात आहे.
 

Web Title: India vs West Indies: History made by Rohit Sharma, 'He' becomes India's first cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.