India vs West Indies: Birthday Boy ravindra jadeja gives India great success | India vs West Indies : 'बर्थ डे बॉय'ने मिळवून दिले भारताला मोठे यश
India vs West Indies : 'बर्थ डे बॉय'ने मिळवून दिले भारताला मोठे यश

ठळक मुद्देया खेळाडूने हा बळी मिळवत स्वत:लाच स्पेशल गिफ्ट दिले आहे.

हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात आपल्या वाढदिवशी एका खेळाडूने भारताला मोठे यश मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूने हा बळी मिळवत स्वत:लाच स्पेशल गिफ्ट दिले आहे.

वेस्ट इंडिजच्या इव्हिन लुईसने संघाला झोकात सुरुवात करून दिली. लुईस बाद झाल्यावर शिमरोन हेटमायरल दमदार फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूने ब्रेंडन किंग भारताच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करत होता. यावेळी भारताच्या रवींद्र जडेजाने त्याचा काटा काढला. किंगला यावेळी ३१ धावांवर जडेजाने बाद केले. आज जडेजाचा वाढदिवस आहे.

रिषभ पंतला का मिळाले पहिल्या सामन्यात स्थान; विराट कोहलीचा खुलासा
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० रिषभ पंतला संधी द्यायची की संजू सॅमसनला, यावर बरीच चर्चा सुरु होती. पण अखेर सॅमसनला डावलून पंतला संघात स्थान देण्यात आले. पण पंतला या सामन्यात का स्थान देण्यात आले, याबाबतचा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे.

पंतबाबत विराट कोहली म्हणाला की, " पंत हा एक युवा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला जर संघातून वगळले तर ते योग्य होणार नाही. त्याला संघात स्थान दिल्यावर जे काही होईल, त्यासाठी संघ व्यवस्थापन जबाबदार असेल. या गोष्टीचा अर्थ असा होत नाही की पंतला पर्याय नाही. भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षाही चांगले गुणवान खेळाडू आहेत." 

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या संघात कोणाची एंट्री आणि कोणाला डच्चू; जाणून घ्या...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याला काही मिनिटांतच सुरुवात होणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यासाठी भारताच्या संघात नेमके कोणला स्थान मिळाले आहे ते जाणून घ्या...

या सामन्यासाठी रोहित शर्माबरोबर सलामीला लोकेश राहुल येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येईल. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रने श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा हे दोघे बर्थ डे बॉय येणार आहेत. त्यानंतर शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा क्रमांक येतो.

या सामन्यामध्ये तीन गोलंदाजांना संधी दिली आहे. या संघात भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे, त्याचबरोबर दीपक चहल आणि युजवेंद्र चहल यांना संघात स्थान मिळाले आहे.

हैदराबादच्या स्टेडियमच्या एका स्टँडला दिले मोहम्मद अझरुद्दिनचे नाव
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना काही मिनिटांत हैदराबादला सुरु होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी येथील राजीव गांधी स्टेडियममधील नॉर्थ स्टँडचे नाव बदलण्यात आले आहे. या स्टँडला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनचे नाव देण्यात आले आहे.

आज या स्टँडचे अनावरण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते सामन्याच्या काही वेळापूर्वी होणार आहे. हा स्टँड व्हीव्हीएस लक्ष्मण पेव्हेलियनच्या वरच्या बाजूला असणार आहे.

सध्याच्या घडीला अझर हा हैदराबाद क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. या वर्षी २७ सप्टेंबरपासून अझरने अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली आहेत. अझरने भारतासाठी ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. अझरवर मॅच फिक्सिंगचा आरोप काही वर्षांपूर्वी लावण्यात आला होता. त्यावेळी त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कालांतराने त्याच्यावरील ही बंदी बीसीसीआयने उठवली आणि पुन्हा एकदा अझर क्रिकेटमध्ये सक्रीय झाला.
 

Web Title: India vs West Indies: Birthday Boy ravindra jadeja gives India great success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.