India vs West Indies, 2nd ODI: रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इतिहासात कुणालाच जमला नाही हा पराक्रम

वनडेतील त्याचे हे 28वे शतक ठरलं, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे तिसरे शतक ठरले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 04:08 PM2019-12-18T16:08:15+5:302019-12-18T16:09:07+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies, 2nd ODI: Rohit Sharma creates history as he becomes the first opener to score 10 international centuries in a calendar year | India vs West Indies, 2nd ODI: रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इतिहासात कुणालाच जमला नाही हा पराक्रम

India vs West Indies, 2nd ODI: रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इतिहासात कुणालाच जमला नाही हा पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. रोहितनं वन डेतील 28वे शतक झळकावताना विशाखापट्टणमच्या खेळपट्टीवर वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. क्रिकेटच्या इतिहासात असा विक्रम आतापर्यंत कोणालाही जमलेला नाही. 

लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या 10 षटकांत बिनबाद 55 धावा जोडल्या. सामन्याच्या 16व्या षटकात लोकेशचा एक फटका चुकला आणि तो झेलबाद होता होता वाचला. निकोलस पूरणला तो झेल टिपता आला नाही. त्यानंतर लोकेशनं 46 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रोहितनं 33 वी धाव घेत 2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1300 धावांचा पल्ला गाठला. त्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितनं संयमी खेळ केला. रोहित व राहुल या जोडीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राहुलनं विंडीजच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यानं सुरेख फटकेबाजी करताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 

रोहितनंही 67 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे 43वे तर विंडीजविरुद्धचे 11वे अर्धशतक ठरले. या अर्धशतकी कामगिरीसह त्यानं महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला विक्रम मोडला. वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहितनं नावावर केला. त्यानं आजच्या सामन्यात एक षटकार खेचला. विंडीजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 29 षटकार खेचणारा तो पहिला भारतीय ठरला. त्यानं धोनीचा 28 षटकारांचा विक्रम मोडला. या विक्रमात विराट कोहली 25 षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.  

2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही रोहितनं नावावर केला. सरत्या वर्षातील हे त्याचे 12वे अर्धशतक ठरले. त्यानं वेस्ट इंडिजच्या शे होप व टीम इंडियाच्या विराट कोहली यांचा 11 अर्धशतकांचा विक्रम मोडला. रोहितनं त्यानंतर धावांचा वेग वाढवला. त्यानं अर्धशतकाचे शतकात रुपातंर करताना 107 चेंडूंत 100 धावा केल्या. वनडेतील त्याचे हे 28वे शतक ठरलं, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे तिसरे शतक ठरले. 

सलामीवीर म्हणून रोहितचे हे 26वे शतक ठरले. त्यानं विंडीजच्या ख्रिस गेलच्या 25 शतकांचा विक्रम मोडला. या विक्रमात सचिन तेंडुलकर 45 शतकांसह आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ सनथ जयसुर्या ( 28) आणि हाशिम आमला ( 27) यांचा क्रमांक येतो. कॅलेंडर वर्षातील त्याचे हे 7 वे वन डे शतक आहे. या कामगिरीसह त्यानं सौरव गांगुली ( 2000), डेव्हिड वॉर्नर ( 2016) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमात सचिन तेंडुलकर ( 1998) 9 शतकांसह आघाडीवर आहे. 
पण, एका कॅलेंडर वर्षात 10 किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणाऱ्या भारतीय फलंदाजांत त्यानं स्थान पटकावले. सचिन तेंडुलकर ( 1998), राहुल द्रविड ( 1999), विराट कोहली ( 2017, 2018 आणि 2019) यांनी हा पराक्रम केला आहे. पण, या तिघांनाही किंवा जगात कुणालाच न जमलेला विक्रम रोहितनं आज नावावर केला. कॅलेंडर वर्षात 10 शतकं करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला आहे. त्यानं कॅलेंडर वर्षात कसोटीत तीन, तर वन डेत 7 शतकं झळकावली आहेत.
 

Web Title: India vs West Indies, 2nd ODI: Rohit Sharma creates history as he becomes the first opener to score 10 international centuries in a calendar year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.