India vs West Indies 2nd ODI: Rishabh Pant and Kuldeep yadav made cricket pitch in hotel, video goes viral | India vs West Indies 2nd ODI: हॉटेलमध्येच बनवलं कुलदीप आणि पंतने पीच, व्हिडीओ वायरल
India vs West Indies 2nd ODI: हॉटेलमध्येच बनवलं कुलदीप आणि पंतने पीच, व्हिडीओ वायरल

पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : पावसाचा फटका वेस्ट इंडिजमध्ये असलेल्या भारतीय संघालाही बसला आहे. पावसामुळे भारतीय संघाला मैदानात सराव करता आलेला नाही. पण भारतीय खेळाडू पक्के व्यावसायिक आहेत. त्यामुळे सरावाला ते दांडी मारत नाहीत. आता मैदानात जरी सराव करता येत नसला तरी यष्टीरक्षक रिषभ पंत आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांनी वास्तव्य करत असलेल्या हॉलेटमध्येच पीच बनवलं आणि त्यावर सराव केला. हॉटेलमध्ये त्यांनी कसं पीच बनवलं आणि सराव कसा केला, याचा एक व्हिडीओ सध्या वायरल होताना दिसत आहे. पंतने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

पाहा खास व्हिडीओ

भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट ऑफ स्पेन मैदानात रंगणार आहे. तसेच हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र या सामन्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

भारताचा कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील पहिला वन डे सामना रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आज रंगणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात देखील पावसाचे संकट असणार असल्याचे रिपोर्टनूसार समजते आहे. 

तसेच सामन्याआधी सराव करताना पावसाने व्यत्यय आणल्याने भारताचा फलंदाज रोहित शर्मा सराव करताना पाऊस आल्याने छत्री घेऊन मैदानाबाहेर जाताना दिसतो आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अ‍ॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.

Web Title: India vs West Indies 2nd ODI: Rishabh Pant and Kuldeep yadav made cricket pitch in hotel, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.