अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः विराट कोहलको घुस्सा क्यों आता हैं, असे म्हटले जाते. कारण कोहलीला मैदानात बऱ्याचदा रागावलेला साऱ्यांनीच पाहिले आहे. पण आता कोहलीने आपला राग कमी करायचे ठरवले आहे. यासाठी कोहलीने चक्क एका पुस्तकाचा आधार घेतला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीला 9 धावा करता आल्या. सामन्यापूर्वी कोहलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना बाऊन्सर टाकण्याचे चॅलेंज दिले होते. पण कोहली या डावात बाऊन्सरवरच बाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कोहली पेव्हेलियनमध्ये बसून एक पुस्तक वाचताना दिसला. या पुस्तकाचे नाव वाचल्यावर कोहली ते का वाचत असावा, याचा उलगडा काही जणांना झाला आहे.

कोहली पेव्हेलियनमध्ये बसून ‘डिटॉक्स युअर इगो’ हे पुस्तक वाचताना पाहायला मिळाला. कोहली हे पुस्तक वाचत असताना त्याचा फोटो काढण्यात आले. त्याचे हे फोटो आता चांगलेच वायरल झाले आहेत. काही जणांनी तर कोहली योग्य पुस्तक वाचत असल्याचे म्हटले आहे.

विराट कोहलीवर भडकले सुनील गावस्कर
भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर हे विराट कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी समालोचन करताना गावस्कर यांनी कोहलीवर तोफ डागली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीला फक्त 9 धावा करता आल्या. यावेळी एका उसळत्या चेंडूवर कोहली बाद झाला. सामना सुरु होण्यापूर्वी कोहलीने मला मैदानात आल्यावर लगेचच बाऊन्सर टाका, असे सांगितले होते. पण यावेळी उसळत्या चेंडूवरच तो बाद झाल्याचे पाहायला मिळाले.

समालोचन करताना गावस्कर कोहलीवर आणि रवी शास्त्री यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला, त्यावर गावस्कर रागावलेले पाहायला मिळाले.

गावस्कर म्हणाले की, " वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. आर. अश्विनचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहीलेला आहे, त्याचबरोबर वेस्ट इंडिजबरोबर त्याची कामगिरी उजवी राहीलेली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान न देणे, हे धक्कादायक आहे."

अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 कसोटी सामन्यांमध्ये 552 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 60 बळीही मिळवले आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त कामगिरी असताना अश्विनला संघाबाहेर ठेवणे गावस्कर यांना पटलेले दिसत नाही.


Web Title: India vs West Indies, 1st Test: Virat Kohli is taking book to reduce anger, he becomes troll
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.