IND Vs SL 3rd T20I Live : टीम इंडियाच्या ताफ्यात आणखी एका खेळाडूचे पदार्पण, प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त; गब्बरनं नाणेफेक जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 07:38 PM2021-07-29T19:38:45+5:302021-07-29T19:39:07+5:30

India vs Sri Lanka 3rd T20I : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही.

India vs SL 3rd T20I live Updates Score Today : Sandeep Warrier have received their caps and all set for T20I Debut, India won Toss | IND Vs SL 3rd T20I Live : टीम इंडियाच्या ताफ्यात आणखी एका खेळाडूचे पदार्पण, प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त; गब्बरनं नाणेफेक जिंकली

IND Vs SL 3rd T20I Live : टीम इंडियाच्या ताफ्यात आणखी एका खेळाडूचे पदार्पण, प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त; गब्बरनं नाणेफेक जिंकली

Next

India vs Sri Lanka 3rd T20I : भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले ८ खेळाडू विलगिकरणात आहेत. अशात दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी चार नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. त्यात दुसऱ्या सामन्यात नवदीप सैनीला दुखापत झाली आणि त्याला मालिकेला मुकावे लागले. आजच्या सामन्यात टीम इंडियाकडून एक खेळाडू पदार्पण करत आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( India won the toss and elected to bat first.)

भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात गोलंदाज नवदीप सैनी याला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली. श्रीलंकेनं हा सामना जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. बीसीसीआयनं काल जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार इशान पोरेल, संदीप वॉरियर, सिमरजीत सिंग आणि आर साई किशोर या नेट बॉलर्सची प्रमुख संघात निवड केली गेली. नवदीप सैनीच्या अनुपस्थितीत  संदीप वॉरियरची निवड झाली. 

कोण आहे संदीप वॉरियर ?
संदीप वॉरियर हा तामिळनाडूचा क्रिकेटपटू आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सकडू खेळतो. स्थानिक ट्वेंटी-२० स्पर्धेत त्यानं ४७ सामन्यांत ४६ विकेट्स घेतल्या आहेत.
 

भारतीय संघ - शिखर धवन, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, नितिश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, चेतन सकारिया. ( Shikhar Dhawan (c), Ruturaj Gaikwad, Devdutt Padikkal, Sanju Samson (w), Nitish Rana, Bhuvneshwar Kumar, Kuldeep Yadav, Rahul Chahar, Sandeep Warrier, Chetan Sakariya, Varun Chakravarthy) 
 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs SL 3rd T20I live Updates Score Today : Sandeep Warrier have received their caps and all set for T20I Debut, India won Toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app