India vs Pakistan, Latest News: Chinnaman Kuldeep Yadav took two important wickets in the match | India Vs Pakistan, Latest News: चायनामन कुलदीप यादवने सामना भारताच्या बाजूने झुकवला
India Vs Pakistan, Latest News: चायनामन कुलदीप यादवने सामना भारताच्या बाजूने झुकवला

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : चायनामननावाने ओळखल्या जाणाऱ्या कुलदीप यादवने कमाल केली. विराटने कुलदीप-चहल या फिरकी जोडीवर विश्वास दाखवला. तो कुलदीपने सार्थ ठरवला. २४ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाबर आझमला क्लिनबोल्ड केले. कुलदिपचा चेंडू त्याला कळलाच नाही. संपूर्ण देशाला ज्याची प्रतिक्षा होती तो बळी कुलदीपने मिळवून दिला. हा सामन्याचा मोठा टर्निंग पॉर्इंट ठरला. त्यानंतर २६ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ६२ धावा करणाऱ्या फखर जमानने फटका मारला. यावर चहलने उत्कृष्ट झेल घेतला. मैदानावर सेट झालेली जोडी कुलदीपने तंबूत पाठवली.  

कुलदीपने या दन विकेट्स काढल्यावर सामना भारताच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. कुलदीपने पहिली विकेट मिळवली त्यापूर्वी पाकिस्तानची १ बाद ११७ अशी अवस्था होती. पण त्यानंतर जवळपास १० षटकांमध्ये पाकिस्तानने पाच विकेट्स गमावल्या. या पाचमधील दोन विकेट्स कुलदीपच्या होत्या.

कुलदिपची आकडेवारी
सामने           बळी   सरासरी   सर्वोत्तम 
४७               ९०     २२.५०      ६-२५

Web Title: India vs Pakistan, Latest News: Chinnaman Kuldeep Yadav took two important wickets in the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.