India vs England 3rd Test Stumps, Day 1. India 99/3, Rohit Sharma & Virat Kohli rebuild for Team India  | India vs England 3rd Test : अक्षर पटेलचा दणका, त्यात रोहित शर्माचे अर्धशतक; पहिल्या दिवशी पडल्या १३ विकेट्स

India vs England 3rd Test : अक्षर पटेलचा दणका, त्यात रोहित शर्माचे अर्धशतक; पहिल्या दिवशी पडल्या १३ विकेट्स

ठळक मुद्देअक्षर पटेलनं घेतल्या ६ विकेट्स, आर अश्विनला ३ बळीरोहित शर्माच्या नाबाद ५७ धावा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा माघारी

India vs England 3rd Test : अक्षर पटेलनं ( Axar Patel) दिलेल्या दणक्यानंतर इंग्लंडच्या संघाला रोहित शर्मानं ( Rohit Sharma) चोपून काढलं. फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाज खेळवण्याची चूक इंग्लंडला पहिल्याच दिवशी महागात पडल्याचे दिसले. अक्षर पटेल आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला आणि प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या दिवसअखेर ३ बाद ९९ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाचा डाव सावरला.  जो रुट बाद होताच विराट कोहलीनं केलं भन्नाट सेलिब्रेशन; सोशल मीडियावर Video Viral


नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय फिरकीपटूंनी त्याला हा निर्णय का घेतला, असा विचार करण्यास भाग पाडले. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मानं ( Ishant Sharma) इंग्लंडला तिसऱ्याच षटकात धक्का दिला. कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) खेळपट्टीचा मूड पाहताच लगेच फिरकीपटूंना पाचारण केलं. त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अक्षर पटेलनं ३८ धावांत ६ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ५३) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. Ind vs Eng, Ind Vs Eng Live Match भारतीय क्रिकेटपटूंची राजकीय इनिंग; एकानं जॉईन केलं BJP, तर एक तृणमूल काँग्रेसमध्ये

शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा झटपट माघारी परतल्यानंतर रोहितनं कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहितनं घरच्या मैदानावर ६००० आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो ९वा भारतीय फलंदाज ठरला. रोहितनं कसोटीत सलामीवीर म्हणून सहाव्यांदा ५०+ धावा केल्या. विराट कोहलीला जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर जीवदान मिळालं. पण, जॅक लिचनं त्याला २७ धावांवर माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला.  Ind vs Eng Pink Ball Test बेन स्टोक्सनं असं केलं तरी काय, की विराट कोहलीला अनावर झाला राग; सुनील गावस्करांनी टोचले कान

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs England 3rd Test Stumps, Day 1. India 99/3, Rohit Sharma & Virat Kohli rebuild for Team India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.