India vs Australia : It Will Be Nice If He Gets Injured For A Long Time: KL Rahul On David Warner’s Injury | India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत दीर्घकाळ कायम राहिल्यास उत्तमच - लोकेश राहुल  

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत दीर्घकाळ कायम राहिल्यास उत्तमच - लोकेश राहुल  

India vs Australia : भारतीय गोलंदाजांना दोन्ही वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं. अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेन यांनी दमदार फटकेबाजी करून टीम इंडियासमोर धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या वन डेत ५१ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. पण, तिसऱ्या वन डेपूर्वी ऑसींना धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू वॉर्नरनं दुखापतीमुळे तिसऱ्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. वॉर्नरची दुखापत दीर्घकाळ कायम राहणं टीम इंडियासाठी फायद्याचे असेल, असे मत टीम इंडियाचा फलंदाज लोकेश राहुलनं व्यक्त केलं. अर्थात तो हे मस्करीत म्हणाला.

वॉर्नरच्या दुखापतीबाबत लोकेश म्हणाला, तो दीर्घकाळ दुखापतीमुळे बाहेर राहिल्यास उत्तमच आहे. वॉर्नरनं पहिल्या वन डे त ६९ आणि दुसऱ्या सामन्यात ८३ धावा चोपल्या. रविवारी झालेल्या लढतीत धावबाद झाल्यानं त्याला शतकापासून वंचित रहावे लागले. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडिचे स्नायू ताणले गेले आणि त्यानं त्वरित मैदान सोडलं. डेव्हिड वॉर्नरची दुखापत गंभीर?; वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेतून घेतली माघार!

 
 लोकेश म्हणाला,''डेव्हिड वॉर्नर कितीकाळ मैदानाबाहेर राहिल राहिल, याची कल्पना नाही. असं कोणाबरोबरच होऊ नये, ही माझी इच्छा, परंतु तो दीर्घकाळ दुखापतीमुळे बाहेर राहणं हे आमच्यासाठी फायद्याचे आहे. '' 

सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या वन डेतही ऑस्ट्रेलियानं पाहुण्या टीम इंडियावर ५१ धावांनी विजय मिळवला. स्टीव्हन स्मिथची ( १०४) शतकी खेळी अन् फिंच ( ६०), वॉर्नर ( ८३), मार्नस लाबुशेन ( ७०) व ग्लेन मॅक्सवेलच्या ( ६३*) अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४ बाद ३८९ धावांचा डोंगर उभा केला. भारताविरुद्धची ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात टीम इंडियाला ९ बाद ३३८ धावा करता आल्या. विराट कोहली ( ८९) आणि लोकेश राहुल ( ७६) यांच्याव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia : It Will Be Nice If He Gets Injured For A Long Time: KL Rahul On David Warner’s Injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.