ब्रिस्बेन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागला. पहिल्या दिवसाचा खेळ सुरू असताना प्रेक्षकांमधील काही जणांनी फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शिवीगाळ केली. एका ऑस्ट्रेलियानं वृत्तपत्रानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. दोन्ही खेळाडू सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना हा प्रकार घडला.
अजिंक्य, हे तू काय केलंस!; कॅप्टनची चूक टीम इंडियाला पडली महागात, Video
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेरॉल्डनं दिलेल्या माहितीनुसार, काही प्रेक्षकांनी सुंदर आणि सिराज क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरले. केट नावाच्या एका प्रेक्षकानं दिलेल्या माहितीनुसार, काही प्रेक्षक सिराज आणि सुंदरसाठी सातत्यानं आक्षेपार्ह भाषा वापरून ओरडत होते, असं सिडनी मॉर्निंग हेरॉल्डनं वृत्तात म्हटलं आहे. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरनं आजच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं आहे. तर मोहम्मद सिराजचा हा तिसरा कसोटी सामना आहे.
रिषभ पंत अपील करत होता; पण अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा फिदीफिदी हसले अन्... Video
सिडनीत झालेल्या तिसऱ्या कसोटीतही सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना हा प्रकार घडला. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था घडलेल्या या प्रकारानं सगळ्यांनाच धक्का बसला. याची तक्रार भारतीय खेळाडूंनी पंचांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी शेरेबाजी करणाऱ्या प्रेक्षकांच्या गटाला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे खेळ १५ मिनिटं थांबला होता.