India vs Australia, 1st T20I : No Jasprit Bumrah & Yuzvendra Chahal for India, Sanju Samson batting at 5, know Playing XI    | India vs Australia, 1st T20I : जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहलला विश्रांती; टीम इंडियानं आखली भारी रणनीती

India vs Australia, 1st T20I : जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहलला विश्रांती; टीम इंडियानं आखली भारी रणनीती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडिया नव्या दमानं ट्वेंटी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची वन डे मालिका २-१ अशी जिंकली. भारताला पहिल्या दोन वन डे सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला आहे आणि त्याच सकारात्मकतेनं ते ट्वेंटी-20 मालिकेत मैदानावर उतरणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, टीम इंडिया तगडं आव्हान ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. 


दोन्ही संघांमधील आकडेवारी
एकूण टी-२० सामने - २१
भारत विजयी   -  ११
ऑस्ट्रेलिया विजयी -   ८
सामना रद्द     १
निकाल नाही     १
२००७ च्या पहिल्या सामन्यात भारत विजयी तर   २०१९ च्या अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव झाला होता.
ऑस्ट्रेलियात टी-२० मालिकेतील भारताची कामिगरी
एकूण मालिका     ४
भारत विजयी     १
ऑस्ट्रेलिया विजयी     १
बरोबरीत     २
ऑस्ट्रेलियात टी-२० सामन्यांत भारताची कामगिरी
एकूण सामने     ८
भारत विजयी     ५
ऑस्ट्रेलिया विजयी     ३
अनिर्णीत     ०

टीम इंडियाचा प्लान

जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांना आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. सलामीला लोकेश राहुल व शिखर धवन मैदानावर उतरणार आहेत. संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर खेळेल. हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन अष्टपैलू खेळाडू संघात आहे. मोहम्मद शमी, टी नटराजन व दीपक चहर हे ३ जलदगती गोलंदाज असतील. 

ऑस्ट्रेलियाचा संघ  - अॅरोन फिंच, डी'आर्सी शॉर्ट, मॅथ्यू वेड, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉईजेस हेन्रीक्स, सीन अॅबोट, मिचेल स्टार्कस मिचेल स्वेप्सन, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड

 

भारतीय संघ - लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, मनीष पांडे,  संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी, टी नटराजन

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia, 1st T20I : No Jasprit Bumrah & Yuzvendra Chahal for India, Sanju Samson batting at 5, know Playing XI   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.