India Tour of England : रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व; विराट कोहली, अजिंक्य रहाणेला विश्रांती, जाणून घ्या Playing XI

India Tour of England :  शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे दोन संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मैदानावर उतरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 03:20 PM2021-07-20T15:20:51+5:302021-07-20T15:22:25+5:30

whatsapp join usJoin us
India Tour of England : Rohit Sharma is leading Indian side against County XI. Virat Kohli rested along with Ajinkya Rahane | India Tour of England : रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व; विराट कोहली, अजिंक्य रहाणेला विश्रांती, जाणून घ्या Playing XI

India Tour of England : रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व; विराट कोहली, अजिंक्य रहाणेला विश्रांती, जाणून घ्या Playing XI

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Tour of England :  शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे दोन संघ एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मैदानावर उतरले आहेत. शिखरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत वन डे मालिका खिशात घालण्याच्या निर्धारानं दुसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरला आहे, तर इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या विराट अँड कंपनीच्या सराव सामन्यालाही आजपासून सुरुवात झाली. श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यात धवननं नाणेफेकीचा कौल गमावला, तर सराव सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. रोहितनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली आजच्या सामन्यात खेळणार नाही.( Team India have won the toss and will bat first against County XI here at Durham, Virat Kohli is not playing the practice game) 

संजू सॅमसन दुसऱ्या सामन्यालाही मुकला; मालिकेत खेळणार की नाही?, BCCIनं दिले अपडेट्स

४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या तयारीलाही टीम इंडिया आजपासून सुरूवात करणार आहे. टीम इंडिया विरुद्ध कौंटी एकादश यांच्यातला तीन दिवसांचा सराव सामनाही आजपासून सुरू होत आहे. रिषभ पंतचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असला तरी तो पहिल्या सराव सामन्यात खेळणार नाही. त्याची आणखी एक कोरोना चाचणी होईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर तो संघासोबत सराव करण्यास सुरुवात करेल. वृद्धीमान सहा हाही विलगिकरणात असल्यानं सराव सामन्यात लोकेश राहुल यष्टिरक्षकाच्या भूमिकेत दिसेल. 

मयांक अग्रवाल सराव सामन्यात रोहितसह सलामीला येणार आहे. अजिंक्य रहाणेलाही विश्रांती दिली आहे. मोहम्मद शमी, आर अश्विन हेही या सामन्यात नाहीत. 

भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, लोकेश राहुल ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह,  मोहम्मद सिराज ( Playing XI : Rohit Sharma (Capt), Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Hanuma Vihari, KL Rahul (WK), Ravindra Jadeja, Axar Patel, Shardul Thakur, Umesh Yadav, Jasprit Bumrah, Md Siraj)

थेट प्रक्षेपण - https://www.youtube.com/watch?v=C45K82k5g74

Web Title: India Tour of England : Rohit Sharma is leading Indian side against County XI. Virat Kohli rested along with Ajinkya Rahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.