Virat Kohli has vaccinated : शक्य तितक्या लवकर कोरोना लस घ्या; विराट कोहलीचं लस घेतल्यानंतर आवाहन 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 01:25 PM2021-05-10T13:25:07+5:302021-05-10T13:25:22+5:30

whatsapp join usJoin us
India skipper Virat Kohli receives first dose of COVID-19 vaccine, appeal all to vaccinate as soon as you can  | Virat Kohli has vaccinated : शक्य तितक्या लवकर कोरोना लस घ्या; विराट कोहलीचं लस घेतल्यानंतर आवाहन 

Virat Kohli has vaccinated : शक्य तितक्या लवकर कोरोना लस घ्या; विराट कोहलीचं लस घेतल्यानंतर आवाहन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत. शिखर धवन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्यापाठोपाठ विराटनंही पहिला डोस घेतला. त्यानं इतरांनाही शक्य तितक्या लवकर ही लस घ्या, असे आवाहन केलं आहे. कोरोना लढ्यात विराटही मैदानावर उतरला आहे. त्यानं पत्नी अनुष्का शर्मा व Kettoसह 7 कोटींचा निधी गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यात विराट-अनुष्कानं दोन कोटींची मदतही केली आहे.


इंग्लंडला जाण्यापूर्वी घ्यावी लागेल फक्त कोव्हिशिल्डचीच लस
भारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. १८ ते २३ जून या कालावधीत तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे. चार महिन्यांच्या या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना फक्त कोव्हिशिल्ड ( Covishield ) ची लस घ्यावी लागेल, असे वृत्त Times Nowने प्रसिद्ध केलं आहे. 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये जाणार आहेत. त्यांना दुसरा डोस घेता येणार नाही. कोव्हिशिल्ड ही लसीचा दुसरा डोस खेळाडूंना लंडनमध्येही घेता येईल, त्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे. ''कोव्हिशिल्ड ही लंडनच्या AstraZeneca vaccineच उत्पादन आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना दुसरा डोस तिथे घेता येईल,''असे सूत्रांनी सांगितले. 



विराट कोहली ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले आहे आणि २४ तासांहून कमी कालावधीत त्यांनी ३.६ कोटी रक्कम जमाही केली आहे. यातील २ कोटी रक्कम ही विराट-अनुष्का यांनी दान केली आहे. या मोहिमेला मिळलाले प्रतिसाद पाहून विराट व अनुष्का यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.  Ketto यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करत आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: India skipper Virat Kohli receives first dose of COVID-19 vaccine, appeal all to vaccinate as soon as you can 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.