हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याला काही मिनिटांचा अवधी राहीलेला आहे. पण या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणते खेळाडू संघात असतील, याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.
10:28 PM
भारताचा सहा विकेट्स राखून सहज विजय
10:13 PM
रिषभ पंत १८ धावांवर आऊट
09:55 PM
कोहलीचे दमदार अर्धशतक
09:51 PM
राहुल ६२ धावांवर आऊट झाला
09:47 PM
लोकेश राहुलचे अर्धशतक
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात लोकेश राहुलने अर्धशतक झळकावले.
08:35 PM
वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे आव्हान
08:22 PM
हेटमायर पाठोपाठ पोलार्डही आऊट
08:20 PM
अर्धशतकवीर हेटमायरचे आऊट
08:10 PM
षटकारासह हेटमायरने पूर्ण केले अर्धशतक
07:45 PM
वेस्ट इंडिजचे शतक पूर्ण
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जोरदार आक्रमण करत दहाव्या षटकात आपले शतक पूर्ण केले.
07:30 PM
इव्हिन लुईस आऊट
इव्हिन लुईसच्या रुपात वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला. लुईसने फक्त १७ चेंडूंत ४० धावांची खेळी साकारली.
07:23 PM
इव्हिन लुईसची बॅट तळपली
वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईसची बॅट या सामन्यात चंगलीच तळपल्याचे पाहायला मिळाले. दीपक चहरच्या तिसऱ्या षटकात दोन षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर १९ धावा लुटण्यात आल्या.
07:09 PM
वेस्ट इंडिजला पहिला धक्का
भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने भारताला पहिला बळी मिळवून दिला.
06:51 PM
नाणेफेकीचा कौल लागला तरी कसा, पाहा व्हिडीओ...
06:37 PM
नाणेफेक जिंकत भारताने वेस्ट इंडिजला केले फलंदाजीसाठी पाचारण
06:23 PM
हैदराबादमधील ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारत सज्ज