IND vs WI 4th ​​ODI: Pakistan fall down in front of Rohit Sharma | IND vs WI 4th ODI : पाकिस्तानच्या खेळाडूने घातले होते रोहित शर्मापुढे लोटांगण
IND vs WI 4th ODI : पाकिस्तानच्या खेळाडूने घातले होते रोहित शर्मापुढे लोटांगण

ठळक मुद्देपाकिस्तानच्या खेळाडूने भारताच्या खेळाडूसमोर लोटांगण घातलेले तुम्हाला माहिती आहे का... पण अशी गोष्ट घडली आहे.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाबरोबर भारतीय खेळाडूंचे काह वेळा वादही झाले. पण पाकिस्तानच्या खेळाडूने भारताच्या खेळाडूसमोर लोटांगण घातलेले तुम्हाला माहिती आहे का... पण अशी गोष्ट घडली आहे. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. त्यावेळी त्यांच्या गोलंदाजांना रोहितपुढे लोटांगण घालावे लागले. त्यावेळी चाहत्यांना पाकिस्तानविरुद्धच्या या गोष्टीची आठवण आल्यावाचून राहीली नाही.

हा प्रकार घडला होता तो आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहितकडे सोपवण्यात आले होते. भारताने या स्पर्धेतील एका सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली होती. पाकिस्तानने भारतापुढे 238 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने 111 धावांची दमदार खेळी साकारली होती. या खेळीदरम्यान पाकिस्तानचा एक खेळाडू रोहितपुढे लोटांगण घालत असल्याचे दिसले आणि चाहत्यांमध्ये त्याची चांगलीच चर्चा झाली.

या सामन्यात खेळत असताना रोहितपुढे पाकिस्तानचा मोहम्मद नवाज हा खेळाडू चालत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि लोटांगण घालावे असा तो रोहितपुढे पडला. त्यावेळी रोहितने नवाझला धीर दिला आणि त्याला उभे करण्यात मदत केली होती. ही आठवण रोहितच्या शतकानंतर पुन्हा एकदा चाहत्यांनी जागवली.

हा पाहा शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ


Web Title: IND vs WI 4th ​​ODI: Pakistan fall down in front of Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.