Ind vs NZ, 1st T20 : रोहित शर्मा बनला सुपरमॅन; हवेत पकडली एका हातात कॅच

गप्तीलचचा अप्रतिम झेल यावेळी रोहितने घेतल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 01:28 PM2020-01-24T13:28:48+5:302020-01-24T13:31:53+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs NZ, 1st T20: Rohit Sharma becomes Superman; Catch in one hand caught in the air | Ind vs NZ, 1st T20 : रोहित शर्मा बनला सुपरमॅन; हवेत पकडली एका हातात कॅच

Ind vs NZ, 1st T20 : रोहित शर्मा बनला सुपरमॅन; हवेत पकडली एका हातात कॅच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा हा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सुपरमॅन झाल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितने सीमारेषेवळ हवेत उडी मारून भन्नाट झेल पकडल्याचे पाहायला मिळाले.

Image

पहिल्या सामन्यात फलंदाजी करत असताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी यावेळी अर्धशतकी भागीदारी रचली. न्यूझीलंडला यावेळी मार्टीन गप्तीलच्या रुपात पहिला धक्का बसला. गप्तीलचचा अप्रतिम झेल यावेळी रोहितने घेतल्याचे पाहायला मिळाले.

Image

रोहि सीमारेषेवर उभा होता. त्यावेळी त्याने झेल पकडण्याा प्रयत्न केला. यावेळी आपला पाय सीमारेषेला लागेल, असे रोहितला वाटले. त्यामुळे त्याने चेंडू हवेत उडवल आणि त्यानंतर झेल पकडला. यानंतर तिसऱ्या पंचांनी रोहितचा पाय सीमारेषेला लागला आहे की नाही, हे पाहिले आणि त्यानंतर गप्तील आऊट असल्याचा निर्णय दिला.

Image

Image

... अन् रिषभ पंतचे नाव विसरला विराट कोहली, झाली मोठी फजिती
भारताचा कर्णधार विराट कोहलीची न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यापूर्वी फजिती झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कोहली पंतचे नाव घ्यायलाच विसरला.

नेमकं घडलं तरी काय...
कोहली हा नाणेफेकीसाठी मैदानात आला. बऱ्याचदा नाणेफेकीचा कौल हा कोहलीच्या बाजूने लागत नाही, पण या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यावर समालोचकाने कोहलीला बोलावले. नाणेफेक जिंकल्यावर तुम्ही काय स्वीकारणार आहात, असा प्रश्न त्याने कोहलीला विचारला. यावेळी आम्ही गोलंदाजी स्वीकारत आहोत, असे कोहलीने स्पष्ट केले.

नाणेफेकीच्या निर्णयानंतर समालोचकाने कोहलीला आज कोणते खेळाडू खेळणार आहेत, असा प्रश्न विचारला. यावर कोहलीने जे खेळाडू खेळणार नाहीत त्यांची नावे घ्यायला सुरुवात केली. यावेळी कोहलीने कुलदीप यादव, नवदीप सैनी आणि संजू सॅमसन यांची नावे घेतली. पण त्यानंतर अन्य दोन खेळाडूंची नावे कोहलीला आठवत नव्हती. त्यामुळे त्याची फजिती झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ते दोन खेळाडू होते रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्यामुळे या सामन्यात लोकेश राहुलकडेच यष्टीरक्षणाचीच जबाबदारी असेल. भारताच्या संघात शिवम दुबेला संधी देण्यात आली आहे.

असा आहे भारताचा संघ

असा आहे न्यूझीलंडचा संघ

Web Title: Ind vs NZ, 1st T20: Rohit Sharma becomes Superman; Catch in one hand caught in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.