IND vs ENG : विराट झाला 'सैराट'; कॅच पकडल्याच्या जोशात हासडली शिवी

बटलरने ४६ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा चोपल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि दोन षटकार लगावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 01:20 PM2018-07-04T13:20:52+5:302018-07-04T13:28:11+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG: Virat became 'Sarat'; The catch of catch | IND vs ENG : विराट झाला 'सैराट'; कॅच पकडल्याच्या जोशात हासडली शिवी

IND vs ENG : विराट झाला 'सैराट'; कॅच पकडल्याच्या जोशात हासडली शिवी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर : आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतीय कर्णधार विराट कोहलीचे हेच रुप काल इंग्लंडमध्येही पहायला मिळाले. जोस बटलरचा झेल घेतल्यानंतर विराट कोहलीचा संयम सुटल्याचे दिसून आले. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत टी-20 मालिकेत विजयी सुरुवात केली.  इंग्लंडने निर्धारीत 20 षटकात ८ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारली. यामध्ये सलामीवीर जोस बटलरच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतापुढे  आव्हान उभे केले. बटलरने ४६ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा चोपल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि दोन षटकार लगावले. एकाबाजूने फलंदाज बाद होत असताना बटलर खोऱ्याने धावा काढत होता. 18 व्या षटकांतील चौथ्या चेंडूवर कुलदीर यादवने बटलरला विराट कोहलीकरवी झेलबाद केले.  

भारतीय कर्णधार विराट कोहलीने जोस बटलरचा शानदार झेल घेत त्याला तंबूत झाडले. झेल घेतल्यानंतर कोहली थोडा आक्रमक झाला. बटलरचा झेल पकडल्यावर आक्रमक झालेल्या कोहलीच्या तोंडातून अपशब्द निघाले.



सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये कोहली आक्रमक दिसत असून त्याच्या लिप्सिंगवरुन तो अपशब्द वापत असल्याचे दिसून येते.  विराटशिवाय काल भुवनेश्वर आणि डेव्हिड विली यांच्यातही शाब्दित चकमक झाल्याचे पहायला मिळाले. 

 

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तीन सामन्याच्या टी-20 मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे. टी-20 मालिकेनंतर भारत इंग्लंडविरोधात पाच कसोटी आणि तीन वन-डे सामन्याची मालिका खेळणार आहे. 

Web Title: IND vs ENG: Virat became 'Sarat'; The catch of catch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.