IND vs ENG : जसप्रीत बुमराहची माघार, आता आणखी एक गोलंदाज होणार संघाबाहेर; जाणून घ्या BCCI असं का करणार

India vs England : टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: March 1, 2021 09:56 AM2021-03-01T09:56:47+5:302021-03-01T09:58:19+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG: Varun Chakravarthy fails to impress in BCCI's fitness test, could be dropped from T20I squad: Report | IND vs ENG : जसप्रीत बुमराहची माघार, आता आणखी एक गोलंदाज होणार संघाबाहेर; जाणून घ्या BCCI असं का करणार

IND vs ENG : जसप्रीत बुमराहची माघार, आता आणखी एक गोलंदाज होणार संघाबाहेर; जाणून घ्या BCCI असं का करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे४ मार्चपासून सुरू होणार चौथा कसोटी सामना कसोटी मालिकेनंतर अहमदाबाद येथे पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार

India vs England : टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) वैयक्तिक कारणास्तव BCCI कडे रजा मागितली होती आणि चौथ्या कसोटीपूर्वी BCCIनं त्याला रिलीज केलं. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली असताना त्यानंतर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत वरूण चक्रवर्थीची ( Varun Chakravarthy) पदार्पणाची संधी पुन्हा एकदा हुकण्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये ( Fitness Test) कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा अपयशी ठरला आणि त्यामुळे ट्वेंटी-२० संघातून त्याला वगळले जाऊ शकते, असे वृत्त Cricbuzz नं दिले आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार खेळाडूनं नवीन २ किलोमीटर धावण्याची टेस्ट पास करावी किंवा यो-यो टेस्टमध्ये १७.१ गुणांची कमाई करावी. इशान किशन, संजू सॅमसन, जयदेव उनाडकट, सिद्धार्थ कौल आणि अन्य खेळाडूंची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट घेतली गेली. त्यापैकी केवळ किशनची इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवड झाली.  चक्रवर्थी हा अजूनही टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा सदस्य आहे, बीसीसीआयकडून अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. २०१७-१८मध्ये बीसीसीआयनं अंबाती रायुडू, मोहम्मद शमी, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांना यो-यो कसोटीत अपयशी ठरल्यानंतर संघातून वगळण्यात आळे होते. रायुडू, रैना आमइ शमी यांनी त्यानंतर पुन्हा झालेल्या यो-यो टेस्ट पास करून संघात पुनरागमन केले.


वरुण चक्रवर्थीला दुसऱ्यांदा बसेल धक्क
फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्थी याला पुन्हा संघाबाहेर बसावे लागल्यास हा त्याच्यासाठी दुसरा धक्का असेल. २०२०च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेसाठी वरुण चक्रवर्थीची निवड झाली होती, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. नोव्हेंबरपासून तो क्रिकेटपासून दूर आहे.   

कधी व कुठे होणार ट्वेंटी-२० मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका अहमदाबाद येथे होणार आहे. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने होतील. त्यानंतर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी संघ पुण्यासाठी रवाना होईल. २३ , २६ आणि २८ मार्चला वन डे सामने होतील.  


 
ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

Web Title: IND vs ENG: Varun Chakravarthy fails to impress in BCCI's fitness test, could be dropped from T20I squad: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.