IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला

कोण आहे तो दिग्गज जो २२ वर्षांनी पुन्हा टीम इंडियाच्या ताफ्यात दिसला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 19:03 IST2025-06-08T18:59:00+5:302025-06-08T19:03:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Test Series Shubman Gill Lead Team Start Training Adrian Le Roux Joins Team India In England As Strength And Conditioning Coach Replace Soham Desai | IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला

IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी लंडनमध्ये पोहचला आहे. इथं पोहचल्यावर भारतीय संघाने सराव सत्राचीही सुरुवात केलीये. बीसीसीआयने भारतीय संघाच्या सराव सत्राचा खास व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जुना भिडू तब्बल २२ वर्षांनी भारतीय ताफ्यात परतल्याचेही दिसून येते. जाणून घेऊयात कोण आहे  हा जुना भिडू?  त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

BCCI नं शेअर केला खास व्हिडिओ

बीसीसीआयने जो खास व्हिडिओ शेअर केलाय त्यात भारतीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलसह स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अन्य खेळाडू लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर कसून सराव करताना दिसते.भारतीय खेळाडूंनी रनिंगसह फिल्डिंगचा सराव करण्यावर जोर दिला. इंग्लंडच्या मैदानात जसप्रीत बुमराह हा फक्त ३ सामने खेळणार आहे. त्याच्याशिवाय मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह यांच्यावर गोलंदाजीची प्रमुख मदार असेल.

भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?

कोण आहे तो दिग्गज जो २२ वर्षांनी पुन्हा टीम इंडियाच्या ताफ्यात दिसला?

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय ताफ्यात जुना दिग्गज पुन्हा टीम इंडियासोबत दिसणार आहे. एड्रियान ली रोक्स भारतीय संघाचा स्टेंथ अँण्ड कंडीशनिंग कोचच्या रुपात काम पाहणार आहे. सोहम देसाईच्या जागी या दिग्गजाची नियुक्ती करण्यात आलीये. याआधी २००२ ते २००३ या कालावधीत या चेहऱ्याने टीम इंडियासोबत काम केले आहे. आता २२ वर्षांनी पुन्हा एकदा हा दिग्गज दुसऱ्या कार्यकाळासाठी सज्ज झालाय. आयपीएलच्या १८ व्या हंगामात हा चेहरा पंजाब किंग्जच्या संघासोबत दिसला होता. 

Web Title: IND vs ENG Test Series Shubman Gill Lead Team Start Training Adrian Le Roux Joins Team India In England As Strength And Conditioning Coach Replace Soham Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.