IND vs ENG, 4th : unfortunate end for Washington Sundar, India has been all-out for 365 runs in first innings | IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद

IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद

India vs England, 4th Test : रिषभ पंतच्या फटकेबाजीनंतर चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरची ( Washington Sunder) बॅट तळपली.  ६ बाद १४६ वरून त्यानं वॉशिंग्टनच्या साथीनं टीम इंडियाला २५९ धावांपर्यंत नेले. रिषभ व वॉशिंग्टन यांनी सातव्या विकेटसाठी १५८ चेंडूंत ११३ धावा जोडल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल ( Axar Patel) यांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाला मोठी आघाडी मिळवून दिली. चांलग्या फॉर्मात असलेला वॉशिंग्टन कारकिर्दीत पहिले कसोटी शतक पूर्ण करेल असे वाटले होते, पंरतु अक्षर माघारी परतला अन् टीम इंडियाचे दोन फलंदाज गुंडाळण्यात इंग्लंडला फार कष्ट घ्यावे लागले नाही. वॉशिंग्टन १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ९६ धावांवर नाबाद राहिला. भारतानं पहिल्या डावात ३६५ धावा केल्या आणि १६० धावांची आघाडी घेतली. 

सातव्या व आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी
ऑस्ट्रेलिया वि. भारत, सिडनी, २००८ ( पहिला डाव)
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया, सिडनी, २०११ ( दुसरा डाव)
भारत वि. इंग्लंड, अहमदबाद, २०२१ ( दुसरा डाव)  

भारताकडून प्रथमच सातव्या आणि आठव्या विकेटसाठी एकाच कसोटीत शतकी भागीदारी झाल्या. वॉशिंग्टन सुंदर-रिषभ पंत यांनी सातव्या विकेटसाठी ११३ ( १५८ चेंडू ) आणि वॉशिंग्टन - अक्षर पटेल १०६ ( १७९ चेंडू) यांनी शतकी भागीदारी केली. अक्षर पटेला बाद झाला तेव्हा टीम इंडियाच्या ८ बाद ३६५ धावा होत्या. अक्षरनं ९७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. तेव्हा वॉशिंग्टन ९६ धावांवर होता. उर्वरित दोन फलंदाजांना त्याला केवळ साथ द्यायची होती, परंतु इशांत शर्मा व मोहम्मद सिराज यांना बेन स्टोक्सनं शून्यावर बाद केलं आणि वॉशिंग्टनचं शतकाचं स्वप्न अपूरं राहिलं.
 कसोटीत ९०+ धावांवर नाबाद राहिलेले भारतीय फलंदाज
अजित वाडेकर ( ९१*)
गुंडप्पा विश्वनाथ ( ९७*) 
दीलिप वेंगसरकर ( ९८*)
सौरव गांगुली ( ९८*)
राहुल द्रविड ( ९१*)
आर अश्विन ( ९१*)
वॉशिंग्टन सुंदर ( ९६*)  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IND vs ENG, 4th : unfortunate end for Washington Sundar, India has been all-out for 365 runs in first innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.