
IND vs ENG, 4th Test : कम ऑन विराट; भारतीय कर्णधारानं थ्रो केलेला चेंडू जो रूटला लागला अन्... Video
India vs England, 4th Test : भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीतही टीम इंडियानं विजयाच्या दिशेनं कूच केली आहे. रिषभ पंतचे शतक अन् वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ९६ धावांच्या जोरावर टीम इंडियानं पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव गडगडला आणि तिसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत इंग्लंडचे सहा फलंदाज ९५ धावांवर माघारी परतले आहेत. अक्षर पटेल ( Axar Patel) आणि आर अश्विन ( R Ashwin) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्यात भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं केलेला चेंडू इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला लागला. Narendra Modi Cricket Stadium वॉशिंग्टन सुंदरच्या 'या' फोटोने डोळ्यात आणले पाणी; लक्ष्मण, जाफर यांनी कौतुकानं पाठ थोपटली
इंग्लंडचा कर्णधार जो रूट पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यानं ७२ चेंडूंत ३० धावा केल्या. आर अश्विननं त्याला पायचीत केले. रूटला जेव्हा चेंडू लागला तेव्हा तो कम ऑन विराट असा ओरडला. वाह मित्रांनो, चांगली मैत्री निभावलीत; वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर राहिला नाबाद, वीरूसह नेटिझन्सनी इशांत, सिराजला झोडपलं
पाहा व्हिडीओ...
😬😬#INDvENGpic.twitter.com/bloaInF27E
— CricTracker (@Cricketracker) March 6, 2021
Hitting the balls well, Kohli #INDvENGpic.twitter.com/2yXL7grNbf
— Spider-Verse (@Spiderverse17) March 6, 2021
वॉशिंग्टन सुंदरचं दुर्दैवं
- अक्षर पटेला बाद झाला तेव्हा टीम इंडियाच्या ८ बाद ३६५ धावा होत्या. अक्षरनं ९७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. तेव्हा वॉशिंग्टन ९६ धावांवर होता. उर्वरित दोन फलंदाजांना त्याला केवळ साथ द्यायची होती, परंतु इशांत शर्मा व मोहम्मद सिराज यांना बेन स्टोक्सनं शून्यावर बाद केलं आणि वॉशिंग्टनचं शतकाचं स्वप्न अपूरं राहिलं.
- वॉशिंग्टन १७४ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ९६ धावांवर नाबाद राहिला. भारतानं पहिल्या डावात ३६५ धावा केल्या आणि १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या बेन स्टोक्सनं चार, जेम्स अँडरसननं तीन आणि जॅक लिचनं दोन विकेट्स घेतल्या.
- पहिल्या चार कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजामध्ये अक्षर पटेलनं पटकावलं दुसरं स्थान. नरेंद्र हिरवानी यांनी ३६ विकेट्स घेतल्या होत्या, तर अश्विननं २६.. अक्षरनं अश्विनला टाकले मागे
- या मालिकेत आतापर्यंत २५ फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी पायचीत केले आहेत. १९७९-८० नंतर ( २४ LBW वि. ऑस्ट्रेलिया) आणि २०१६-१७ ( २४ LBW वि. इंग्लंड) ही सर्वोत्तम कामगिरी आहे.