India vs Australia, 4th Test : लक बाय चान्स!; कसोटी पदार्पणात टी नटराजननं रचला इतिहास

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून टीम इंडियासोबत आलेल्या टी नटराजन यानं वन डे, ट्वेंटी-20 व कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले.

By स्वदेश घाणेकर | Published: January 15, 2021 06:48 AM2021-01-15T06:48:13+5:302021-01-15T07:06:46+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS : T Natarajan becomes first Indian to make debut in all three formats during same tour | India vs Australia, 4th Test : लक बाय चान्स!; कसोटी पदार्पणात टी नटराजननं रचला इतिहास

India vs Australia, 4th Test : लक बाय चान्स!; कसोटी पदार्पणात टी नटराजननं रचला इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआर अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व हनुमा विहारी यांची माघार टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांना पदार्पण, तर मयांक अग्रवाल व शार्दुल यांचे पुनरागमन

India vs Australia, 4th Test :  इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात लक्षवेधी कामगिरीनंतर इतक्या लवकर टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पणाची संधी मिळेल, असा विचारही टी नटराजननं ( Thangarasu Natarajan) केला नसावा. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढती संख्या लक्षात घेता भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटीत नटराजनला पदार्पणाची संधी मिळेल, हे जवळपास निश्चित होतेच. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) तंदुरुस्तीची संघ व्यवस्थापनानं अखेपर्यंत प्रतीक्षा पाहिली. पण, नाणेफेकीपूर्वी त्यांना टफ कॉल घ्यावा लागला. बुमराहच्या दुखापतीनं नटराजनसाठी कसोटी संघाचेही दार उघडले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून टीम इंडियासोबत आलेल्या टी नटराजन यानं वन डे, ट्वेंटी-20 व कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. वरुण चक्रवर्थीनं दुखापतीमुळे माघार घेतल्यानं ट्वेंटी-20 संघात टी नटराजनचा समावेश केला गेला. त्यानं तीन सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या. कॅनबेरात त्यानं वन डे पदार्पण केलं आणि दोन विकेट्स घेतल्या. चेन्नईच्या एका लहानशा गावातून आलेल्या या खेळाडूनं अथक परिश्रमाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि आज टीम इंडियात जागा पटकावली. नशीबाचीही त्याला साथ मिळाली, हेही तितकेच खरं आहे.

नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा हा परिवार. 2017मध्ये किंग्ल इलेव्हन पंजाबनं त्याला ३ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. परंतु तीन वर्षांत त्याच्या वाट्याला सहाच सामने आले. २०१८मध्ये हैदराबादनं त्याला आपल्या संघात घेतले. २०२०ची आयपीएल गाजवून त्यानं सर्वांचे लक्ष वेधले. 

आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात केवळ एक बदल आहे, तर टीम इंडियाच्या अंतिम ११मध्ये चार बदल पाहायला मिळत आहेत. विल पुकोव्हस्की दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही आणि त्याच्या जागी मार्कस हॅरीसचा समावेश केला गेला आहे. आर अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व हनुमा विहारी यांना दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले आहे. त्यांच्याजागी टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांना पदार्पणाची संधी मिळाली, तर मयांक अग्रवाल व शार्दूल ठाकूर यांचे पुनरागमन झाले.  


एकाच दौऱ्यावर वन डे , ट्वेंटी-20 आणि कसोटी संघात पदार्पण करणारा टी नटराजन हा पहिलाच भारतीय ( जगभरात १७वा) ठरला आहे. एकाच सत्रात तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा भुवनेश्वर कुमार ( २०१२-१३) याच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला. वॉशिंग्टन सुंदरही टीम इंडियांकडून तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा तिसरा खेळाडू ठरला. इशांत शर्मानं १९ वर्ष व १५२ दिवसांचे असताना टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रिषभ पंत ( २१ वर्ष व १७ दिवस) आणि वॉशिंग्टन सुंदर ( २१ वर्ष व १०२ दिवस) यांचा क्रमांक येतो. 

टीम इंडियाची Playing XI : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, टी नटराजन 

Web Title: IND vs AUS : T Natarajan becomes first Indian to make debut in all three formats during same tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.