ICC World Cup 2019 : Sachin Tendulkar picks one among Shami and Bhuvneshwar for West Indies clash | ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमार की मोहम्मद शमी? सचिन तेंडुलकरनं केली एकाची निवड
ICC World Cup 2019 : भुवनेश्वर कुमार की मोहम्मद शमी? सचिन तेंडुलकरनं केली एकाची निवड

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीमुळे अंतिम अकरात स्थान पटकावलेल्या मोहम्मद शमीनं संधीचं सोनं केलं. अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं हॅटट्रिकसह चार विकेट्स घेतल्या. पण, भारतीय संघ गुरुवारी वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे आणि त्या लढतीपूर्वी टीम इंडियाला खूशखबर मिळाली आहे. भुवनेश्वरनं मंगळवारी नेट्समध्ये गोलंदाजी केली आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे विंडीजविरुद्ध अंतिम अकरामध्ये भुवी की शमी असा पेच निर्माण झाला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही हाच प्रश्न विचारण्यात आला आणि त्यानं त्यापैकी एकाची निवड केली.

भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे माघारी परतला होता. पण त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे भुवनेश्वर कुमारला या सामन्याला मुकावे लागले होते. भुवनेश्वरने दुखापतीपूर्वी २.४ षटके टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते. त्यानंतर भुवी मैदानावर परतला नाही. त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळता आले नव्हते. त्याच्या अनुपस्थितीत शमीनं संघात स्थान पटकावून अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिकची नोंद केली. तेंडुलकर म्हणाला,''मी शमीची माफी मागतो, परंतु माझी पहिली पसंती भुवनेश्वर कुमारलाच आहे. या वर्ल्ड कपमध्ये तोच भारतीय संघाची पहिली निवड होता. त्यामुळे तो जर पूर्णपणे तंदुरूस्त असेल तर विंडीजविरुद्ध त्यालाच खेळवावे. विंडीजच्या ख्रिस गेलला रोखण्यासाठी भुवी कामी येईल.''

धोनीच्या मदतीला धावला 'दादा'; टीकाकारांना दिलं सडेतोड उत्तर
अफगाणिस्तानविरुद्धच्या संथ खेळीमुळे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर सातत्यानं टीका होत आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही धोनीच्या 52 चेंडूवरील 28 धावांच्या खेळीवर नाराजी प्रकट केली होती. रशीद खानच्या गोलंदाजीवर धोनी यष्टिचीत झाला होता. या सामन्यात भारताला विजयासाठी घाम गाळावा लागला होता. 224 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्ताने 213 धावांपर्यंत मजल मारली होती. मोहम्मद शमीनं अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. गांगुली म्हणाला,''एका सामन्यावरून धोनीला पारखू नका. तो एक चांगला फलंदाज आहे आणि पुढील सामन्यांत तो हे सिद्ध करून दाखवेल. '' 

Web Title: ICC World Cup 2019 : Sachin Tendulkar picks one among Shami and Bhuvneshwar for West Indies clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.