How Donald Trump pronounces Fakhar Zaman if he visit to Pakistan, Formar England captain Michael Vaughan ask question svg | Donald Trump पाकिस्तान दौऱ्यावर Fakhar Zaman कसे उच्चारतील? इंग्लंडच्या माजी कर्णधारानं घेतली फिरकी

Donald Trump पाकिस्तान दौऱ्यावर Fakhar Zaman कसे उच्चारतील? इंग्लंडच्या माजी कर्णधारानं घेतली फिरकी

भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली या क्रिकेटपटूंसह बॉलिवूड आणि शोले, डीडीएलजे या सुप्रसिद्ध चित्रपटांचा उल्लेख करून उपस्थितांची मने जिंकली. पण, क्रिकेटच्या देवाचं नाव चुकीच्या पद्धतीनं उच्चारल्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्रम्प यांना ट्रोल केलं. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हीन पीटरसन आणि माजी कर्णधार मायकेल वॉन यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले. पण, वॉनने एक पाऊल पुढे टाकताना ट्रम्प यांच्या पाकिस्तान दौऱ्याची प्रतीक्षा असल्याची इच्छा व्यक्त केली.

''काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी ह्युस्टन येथे आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत हाऊडी मोदी कार्यक्रमात फुटबॉल स्डेडियमवर करण्यात आले होते. आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्डेडियम असलेल्या मोटेरावर माझे स्वागत करण्यात आले. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंची ओळख जगभरात आहे.'' असे ट्रम्प म्हणाले होते. ट्रम्प यांनी यावेळी सचिनच्या नावाचा उच्चार सुचीन असा केला.


यावरून आयसीसीनं ट्रम्प यांना कसं ट्रोल केलं ते पाहा...

इंग्लंडचा माजी खेळाडू केव्हीन पीटरसन यानेही ट्रम्प यांची फिरकी घेतली.

पण, मायकेल वॉननं ट्रम्प यांची फिरकी घेताना त्यांच्या पाकिस्तान दौऱ्याची इच्छा व्यक्त केली. 

वॉन म्हणाला, पाकिस्तान दौऱ्यावर ट्रम्प कधी जातील आणि तेथे ते फाखर झमानच्या नावाचा उच्चार कसा करतील, याची उत्सुकता आहे. 

 

English summary :
Can’t wait for Donald Trump to visit Pakistan & see how he pronounces Fakhar Zaman, say Michael Vaughan

Web Title: How Donald Trump pronounces Fakhar Zaman if he visit to Pakistan, Formar England captain Michael Vaughan ask question svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.