यजमान इंग्लंडची स्थिती मजबूत

तिसरा कसोटी सामना : वेस्ट इंडिज फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, ब्रॉडने घेतले सहा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 04:16 AM2020-07-27T04:16:35+5:302020-07-27T04:16:49+5:30

whatsapp join usJoin us
Host England's position is strong against west indies | यजमान इंग्लंडची स्थिती मजबूत

यजमान इंग्लंडची स्थिती मजबूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext



मँचेस्टर : स्टुअर्ट ब्रॉड याच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रविवारी येथे वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १९७ धावात बाद केले. नंतर इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि डॉम सिबले यांनी चहापानापर्यंत नाबाद ८६ धावांची सलामी दिली. त्यामुळे इंग्लंड भक्कम स्थितीत पोहचला आहे.
तिसºया दिवशी वेस्ट इंडिज्च्या दुसºया डावातील उर्वरीत चारही गडी ब्रॉडने बाद केले. त्याने एकूण सहा बळी घेतले. त्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात १७२ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात ३६९ धावा करणाºया इंग्लंडने चहापानापर्यंत बिनाबाद ८६ धावा केल्या होत्या. रोरी बर्न्स (४०) आणि डॉम सिबले (३८) हे खेळपट्टीवर आहेत. त्यामुळे इंग्लंडची आघाडी २५८ धावांची झाली आहे.
वेस्ट इंडिज्ने सहा गडी बाद १३७ धावांवर आपल्या डावाची सुरुवात केली. कर्णधार होल्डर (४६) आणि शेन डॉवरीच(३७) यांनी फॉलोआॅन वाचवला. तर इंग्लंडने गोलंदाजीला जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांच्यासह सुरुवात केली.
मात्र जेव्हा स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अ‍ॅँडरसन यांनी आक्रमण केले तेव्हा परिस्थिती बदलली. ब्रॉडने डोरिचला बाद करत वेस्ट इंडिजच्या डावाचा शेवट केला.
ब्रॉडने हिोल्डरला पायचीत पकडले. कॅरेबियन कर्णधाराने डीआरएस घेतला मात्र मैदानी पंचाचा निर्णय कायम राहिला. त्यानंतर तिसºया षटकात रखिम कॉर्नवॉल (१०) आणि केमार रोच यांना तंबूत पाठवले.
ब्रॉडला साऊथम्पटनमध्ये पहिल्या कसोटीत संघात स्थान मिळाले नव्हते. हा सामना वेस्ट इंडिजने चार गड्यांनी जिंकला. त्याने दुसºया कसोटीत ओल्ड ट्रॅफर्डवर पहिल्या आणि दुसºया डावात प्रत्येकी तीन बळी घेत इंग्लंडच्या विजयात मोठी भूमिका घेतली.
आताच्या या कसोटीतही त्याने पहिल्या डावात ४५ चेंडूत ६२ धावा केल्या होत्या. ही २०१३ नंतर त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ब्रॉड याने आपल्या कारकिर्दीत १८ वेळा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहे. ब्रॉडच्या कसोटी बळींची संख्या आता ४८७ वर पोहचली आहे. तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.
वेस्ट इंडिज्चा कर्णधार जेसन होल्डर याला रोरी बर्न्स याचा झेल घेण्याच्या प्रयत्नात किरकोळ दुखापत झाली. त्यावेळी तो काही क्षण मैदानावरच पडून होता.

Web Title: Host England's position is strong against west indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.