‘Hitman’ Rohit Sharma in form Ipl 2020 | ‘हिटमॅन’ फॉर्ममध्ये आला रे...

‘हिटमॅन’ फॉर्ममध्ये आला रे...

अबुधाबी : मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमधील आपला पहिला विजय मिळवताना कोलकाता नाईट रायडर्सला ४९ धावांनी सहजपणे नमवले. यासह मुंबईकरांनी यूएईमध्ये पहिल्यांदाच विजय मिळवताना गुणतालिकेतही अव्वल स्थानी झेप घेतली.


मुंबईच्या १९५ धावांचा पाठलाग करताना कोलकाताला केवळ ९ बाद १४६ धावाच करता आल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. बुमराह, बोल्ट, पॅटिन्सन आणि चहर यांनी प्रत्येकी २ बळी घेत कोलकाताला रोखले.


त्याआधी, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा जेव्हा फॉर्ममध्ये येतो तेव्हा काय होते, याची प्रचिती केकेआरला आली. सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या रोहितने ३ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले. दुसºयाच षटकात क्विंटन डीकॉक बाद झाल्यानंतर रोहितने सूर्यकुमार यादवसह ९० धावांची भागिदारी केली. यंदाच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सची मुंबईकरांनी जबरदस्त धुलाई केली. सूर्यकुमारने अर्धशतक ३ धावांनी हुकले. युवा शिवम मावीने नियंत्रित मारा केला. आंद्रे रसेल व मावी यांनी अखेरच्या दोन षटकांत अत्यंत चिवट मारा केल्याने मुंबईला दोनशेचा पल्ला गाठता आला नाही.

आयपीएलमध्ये दोनशे षटकार ठोकणारा रोहित चौथा फलंदाज ठरला. याआधी ख्रिस गेल (३२६), एबी डीव्हिलियर्स (२१४) आणि महेंद्रसिंग धोनी यांनी अशी कामगिरी केली आहे.


सामन्यातील रेकॉर्ड
च्२०१३ ते २०१९ दरम्यान सलग सातवेळा केकेआरने आयपीएलमधील आपला पहिला सामना नेहमी जिंकला आहे.
च्आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर असून त्यांनी केकेआरविरुद्ध तब्बल १९ विजय मिळवले आहेत. यानंतर केकेआरचा क्रमांक असून त्यांनी किंग्ज ईलेव्हन पंजाबला १७वेळा नमवले आहे.
च्आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा फटकावण्याचा डेव्हिड वॉर्नरचा ८२९ धावांचा विक्रम रोहित शर्माने मोडला. वॉर्नर आणि रोहित दोघांनी हा विक्रम केकेआरविरुद्ध केला.
च्किएरॉन पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून १५० वा सामना खेळला.
च्आयपीएलमध्ये हिट विकेट होणारा हार्दिक पांड्या ११वा फलंदाज ठरला.
विनिंग स्ट्रॅटेजी
च्केकेआरचे बिग हिटर इयोन मोर्गन व अ‍ॅण्ड्य्रू रसेल यांना रोखण्यात यश. बळी घेण्यापेक्षा जास्त धावा न देण्याला प्राधान्य


टर्निंग पॉइंट
च्रोहित शर्माची ५४ चेंडूंतील आक्रमक ८० धावांची खेळी आणि दुसºया विकेटसाठी सूर्यकुमार यादवसोबत ९० धावांची भागीदारी
रायुडूला मुंबईच्या ‘हटके’ शुभेच्छा : अंबाती रायुडूचा आज वाढदिवस असल्याने त्याला मुंबई इंडियन्सने दिलेल्या हटके शुभेच्छा लक्षवेधी ठरल्या. अंबाती रायुडू चेन्नईकडून खेळण्याआधी मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळायचा. त्याने मुंबईच्या संघाला अनेकदा विजय मिळवून दिले. रायडूचा मुंबई इंडियन्सची टोपी परिधान केलेला फोटो पोस्ट करण्यात आला. फोटोसोबतच ‘हटके ’ शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.‘कायम फलंदाजी करत असणारा अंबाती रायुडू याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! अशाच दमदार आणि मोठी धावसंख्या उभारत राहा फक्त मुंबईविरूद्ध धावा करू नकोस, अशा मजेशीर शुभेच्छा त्याला मुंबई इंडियन्सकडून देण्यात आल्या.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘Hitman’ Rohit Sharma in form Ipl 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.