Hardik Pandya Unveils His Custom Made ‘Kung Fu Pandya’ Jacket   | हार्दिक पांड्याची Creativity; कुंग फू पांडानं वेधलं लक्ष

हार्दिक पांड्याची Creativity; कुंग फू पांडानं वेधलं लक्ष

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे. लंडनमधून शस्त्रक्रीया करून परतल्यानंतर पांड्या मायदेशात व्यायामाला लागला आहे. टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तो आतुर आहे. त्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचा व्हिडीओ पांड्यानं सोशल मीडियावर शेअर केला. तो अधिक काळ सोशल मीडियावरच सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात त्याच्या आणि मॉडल नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या नात्याच्या चर्चाही रंगत आहेत. पण, आता हार्दिक त्याच्या Creativity मुळे चर्चेत आला आहे. 

हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याच्या चर्चाही रंगत आहेत. त्यांना बळ देणारा प्रसंग मागील रविवारी मुंबईत पाहायला मिळाला. हार्दिक आणि नताशा हे दोघेही मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र डीनर घेऊन बाहेर पडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांच्या नात्याला आणखी बळ देणारा प्रसंग गुरुवारी घडला. हार्दिकनं चक्क नताशाला त्याच्या गाडीत लिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी पांड्यानं आणखी एक पोस्ट टाकली. त्यात त्यानं कलाकुसरीनं बनवलेलं जॅकेट परिधान केलं आहे आणि त्यात त्यावरील कुंग फू पांडाचे चित्र लक्ष वेधून घेत आहेत.  


हार्दिक पांड्याच्या पोस्टवर जसप्रीत बुमराहचा यॉर्कर, अन्... 
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे. लंडनमधून शस्त्रक्रीया करून परतल्यानंतर पांड्या मायदेशात व्यायामाला लागला आहे. टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तो आतुर आहे. त्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचा व्हिडीओ पांड्यानं सोशल मीडियावर शेअर केला. पण, या व्हिडीओवरून भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पांड्याची चांगलीच फिरकी घेतली. बुमराहही दुखापतीमुळे विश्रांतीवर आहे आणि तोही तंदुरूस्तीसाठी कसून सराव करत आहे. पण, बुमराहच्या त्या फिरकीनं नेटिझन्सना लोटपोट केले आहे.  

''पुन्हा तंदुरूस्त होण्यासाठी कसून सराव करत आहे. त्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी आहे आणि दमदार कमबॅक करेन. तुमच्या शुभेच्छांसाठी आभार...'' 


त्यावर बुमराहनं कमेंट केली की, तर तुमचा आवाज प्रेशर कुकरसारखा येतोय....'' 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Hardik Pandya Unveils His Custom Made ‘Kung Fu Pandya’ Jacket  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.