भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे. लंडनमधून शस्त्रक्रीया करून परतल्यानंतर पांड्या मायदेशात व्यायामाला लागला आहे. टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तो आतुर आहे. त्यासाठी घेत असलेल्या मेहनतीचा व्हिडीओ पांड्यानं सोशल मीडियावर शेअर केला. पण, या व्हिडीओवरून भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पांड्याची चांगलीच फिरकी घेतली. बुमराहही दुखापतीमुळे विश्रांतीवर आहे आणि तोही तंदुरूस्तीसाठी कसून सराव करत आहे. पण, बुमराहच्या त्या फिरकीनं नेटिझन्सना लोटपोट केले आहे.  

''पुन्हा तंदुरूस्त होण्यासाठी कसून सराव करत आहे. त्यासाठी सर्वकाही करण्याची तयारी आहे आणि दमदार कमबॅक करेन. तुमच्या शुभेच्छांसाठी आभार...'' 


त्यावर बुमराहनं कमेंट केली की, तर तुमचा आवाज प्रेशर कुकरसारखा येतोय....'' 

2018च्या इंग्लंड दौऱ्यावर असताना पांड्याला दुखापत झाली होती आणि 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान तिनं पुन्हा डोकं वर काढलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्याला पुन्हा दुखापत झाली आणि त्यानंतर तो उपचारासाठी विश्रांतीवर आहे. 

आजा मेरे गाड़ी में बैठ जा! हार्दिक पांड्यानं 'तिला' दिली लिफ्ट अन्...
भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्यानं दुखापतीतून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तो अधिक काळ सोशल मीडियावरच सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात त्याच्या आणि मॉडल नताशा स्टॅनकोव्हिक यांच्या नात्याच्या चर्चाही रंगत आहेत. त्यांना बळ देणारा प्रसंग मागील रविवारी मुंबईत पाहायला मिळाला. हार्दिक आणि नताशा हे दोघेही मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र डीनर घेऊन बाहेर पडतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्यांच्या नात्याला आणखी बळ देणारा प्रसंग गुरुवारी घडला. हार्दिकनं चक्क नताशाला त्याच्या गाडीत लिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले. 


काही दिवसांपूर्वी हार्दिकनं नताशाची भेट त्याच्या कुटुंबीयांशीही करून दिली होती. काही महिन्यांपूर्वी हार्दिक नताशासोबत वांद्रे येथे दिसला होता. त्याच्या मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टित तो नताशाला घेऊन आला होता. नताशासोबतच्या नात्याबद्दल हार्दिक अधिक गंभीर आहे आणि त्यानं पार्टित तिची ओळख कुटुंबियांशी करू दिली.या पार्टित हार्दिकचा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडी शर्मा उपस्थित होते. या पार्टित हार्दिकनं नताशाची ओळख त्याचा गर्लफ्रेंड म्हणून सर्वांशी करून दिली.  

मुळची सर्बियाची असलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षीय डान्स शिकायला सुरुवात केली. 2010मध्ये स्पोर्ट्स सर्बिया या किताब जिंकल्यानंतर तिनं स्पोर्ट्समध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. तिने नच बलिए 9 सीजनमध्ये सहभाग घेतला होता. एली गोनी आणि प्रियांक शर्मा यांच्याशीही नताशाचे नाव जोडले गेले आहे. यापूर्वी हार्दिकचे नाव इशा गुप्ता, अॅली अव्हराम आणि उर्वशी रौलेताशी जोडले गेले आहे.

हार्दिक आणि नताशा एकत्र गाडीत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले नाहीत. पण, या दोघांनी पोस्ट केलेल्या स्वतंत्र फोटोवरून तरी ते एकाच गाडीत होते याचा अंदाज बांधणे अवघड नक्की नाही. पाहा तुम्हीच...

Web Title: Hardik Pandya gets roasted by Jasprit Bumrah over his tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.