Haircut by Siddesh Lad from Sunil Narian | सुनील नरेनकडून सिध्देश लाडने करुन घेतली हेअरकटिंग

सुनील नरेनकडून सिध्देश लाडने करुन घेतली हेअरकटिंग

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders)  यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना शानदार विजयांची मालिकाच लावली आहे. केकेआरने अखेरपर्यंत लढत देत अनेक सामने हाताबाहेर गेलेले असताना जिंकताना सर्वांनाच चकीत केले. त्यातच स्टार अष्टपैलू खेळाडू संघाबाहेर बसल्यानंतरही केकेआरने आपला विजयी मार्ग सोडला नाही. मात्र आता तोच स्टार खेळाडू आपल्या संघ सहकाºयाचे केस कापताना दिसल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

कोलकाताच हा स्टार अष्टपैलू आहे सुनील नरेन (Sunil Narian). रविवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. गोलंदाजी शैलीवर शंका निर्माण झाल्याने नरेन या सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे केकेआरला त्याची उणीव प्रकर्षाने जाणवेल असे दिसत होते. मात्र वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने त्याची कमतरता जराही भासू न देताना कोलकाताच्या विजयात निर्णायक कामगिरी केली.

त्याचवेळी, नरेनला सक्तीने संघाबाहेर बसावे लागल्याने त्याने याचा मानसिक परिणाम होणार नाही, याची पुरेपूर दखल घेत संघ सहकाºयांसह पुरेसा वेळ व्यतित केला. आता त्याची गोलंदाजी शैलीही वैध ठरविण्यात आल्याने, लवकरच नरेन खेळताना दिसून येईल.
संघाबाहेर असताना नरेनने आपल्या संघ सहकाऱ्यांसह बरीच मजा मस्ती केल्याचे दिसत आहे. कोलकाताचा युवा फलंदाज सिध्देश लाड याने इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला असून यामध्ये नरेन लाडचे केस कापताना दिसत आहे. लाडनेही या प्रसंगाचे छायाचित्र अपलोड करताना, ‘किंग सुनील नरेनकडून एक गूढ हेअरकट मिळताना,’ अशी कॅप्शन टाकली आहे.

यावर चाहत्यांनीही अनेक लाईक्स करताना कमेंटही केल्या आहेत. सिध्देश यंदाच्या सत्रात पहिल्यांदाच कोलकाताच्या ताफ्यात दाखल झाला आहे. याआधी तो मुंबई इंडियन्स संघात होता. गेल्याच वर्षी त्याने मुंबईककडून पहिल्यांदाच आयपीएल सामना खेळला होता. यंदा मात्र त्याला कोलकाताकडून अद्याप एकही संधी मिळालेली नाही. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Haircut by Siddesh Lad from Sunil Narian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.