‘Gentleman’ Sunil Gavaskar's tongue slipped on anushka Virat kohali | ‘जंटलमन’ गावसकरांची जीभ घसरली

‘जंटलमन’ गावसकरांची जीभ घसरली

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजवर क्रिकेट सामन्यात विराट कोहली अपयशी ठरला, तेव्हा अनेकांनी त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिलाही टार्गेट केले. अनुष्कानेही त्या-त्या वेळी टीकाकारांना थेट उत्तर देत त्यांची बोलती बंद केली. परंतु, आता यामध्ये उडी घेतली आहे, ती माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी. सामन्याचे समालोचन करतानाच त्यांनी विराटबाबत वापरलेल्या अपशब्दांबाबत अनुष्काने थेट उत्तर देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.


सुनील गावसकर यांच्यासारख्या जंटलमन मानल्या जाणाऱ्या ज्येष्ठ खेळाडूकडून अशाप्रकारे एखाद्या महिलेविषयी अपशब्द वापरल्याने सोशल मीडियातही त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
गुरुवारी किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. यानंतर गावसकर यांनी समालोचनात त्याच्यावर टीका करताना अनुष्काचाही उल्लेख केला. ‘विराटने लॉकडाऊमध्ये केवळ अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला,’ अशी टीका त्यांनी केली.


याला सोशल मीडियाद्वारे प्रत्युत्तर देताना अनुष्काने म्हटले आहे की, ‘तुमची प्रतिक्रिया त्रासदायक आहे, परंतु पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार धरण्याचे विधान का केले? गेली अनेक वर्षे एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खासगी आयुष्याचा आदर केलाच असेल, याची मला खात्री आहे. मग, आम्हालाही असाच आदर मिळावा, असे तुम्हाला वाटत नाही का? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना नक्कीच तुमच्या डोक्यात शब्दांचे भांडार असेल, तुमचे विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हते का?’


या टीकेमुळे गावसकर यांना आयपीएलच्या समालोचक समितीतून हटविण्याचीही मागणी होत आहे.


सोशल मीडियाद्वारे प्रत्युत्तर
याला सोशल मीडियाद्वारे प्रत्युत्तर देताना अनुष्काने म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खासगी आयुष्याचा आदर केलाच असेल, याची मला खात्री आहे. मग, आम्हालाही असाच आदर मिळावा, असे तुम्हाला वाटत नाही का? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना नक्कीच तुमच्या डोक्यात शब्दांचे भांडार असेल, तुमचे विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हते का?’


अजिबात दोष दिला नाही गावस्कर यांचा खुलासा
विराटच्या कामगिरीबद्दल मी अनुष्का शर्माला अजिबात दोष देत नाही वा दिलाही नाही, असा खुलासा सुनील गावस्कर यांनी केला आहे. लॉकडाउन काळात विराट टेनिस बॉलने अनुष्कासह क्रिकेटचा सराव करीत होता, असे आपण म्हटले होते. वाटल्यास ते समालोचन तुम्ही ऐकून पाहा, असे सांगून ते म्हणाले की, आकाश चोप्रा यांनी सराव कमी पडल्याचा उल्लेख केला, तेव्हा मी वरील विधान केले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘Gentleman’ Sunil Gavaskar's tongue slipped on anushka Virat kohali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.