भारताचे माजी फिरकीपटू बीएस चंद्रशेखर हॉस्पिटलमध्ये; ICUमध्ये उपचार सुरू

चंद्रशेखर यांनी ५८ कसोटीत २४२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी १९६४ ते १९७९ या कालावधीत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. त्यांनी एक वन डे सामनाही खेळला आणि त्यात तीन विकेट्स घेतल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: January 18, 2021 09:48 AM2021-01-18T09:48:08+5:302021-01-18T09:48:24+5:30

whatsapp join usJoin us
Former India Spinner BS Chandrasekhar Admitted to Hospital in Bangalore | भारताचे माजी फिरकीपटू बीएस चंद्रशेखर हॉस्पिटलमध्ये; ICUमध्ये उपचार सुरू

भारताचे माजी फिरकीपटू बीएस चंद्रशेखर हॉस्पिटलमध्ये; ICUमध्ये उपचार सुरू

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचे माजी क्रिकेटपटू बीएस चंद्रशेखर ( BS Chandrasekhar ) यांना सोमवारी बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल केले गेले. ते सध्या ICUमध्ये उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थीर आहे, अशी माहिती कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्त विनय मृत्यूंजय यांनी दिली. 


त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या यांनी दिली. क्रिकेट मॅच पाहत असताना त्यांना अचानक थकवा जाणवला आणि ते बोलतानाही अडखळत होते. तेव्हा त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन दिवसांत त्यांना घरी पाठवण्यात येईल, असेही संध्या यांनी सांगितले.  

चंद्रशेखर यांनी ५८ कसोटीत २४२ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांनी १९६४ ते १९७९ या कालावधीत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं. त्यांनी एक वन डे सामनाही खेळला आणि त्यात तीन विकेट्स घेतल्या. १९७१मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी मालिका विजयात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ओव्हल कसोटीत त्यांनी ३८ धावांत ६ फलंदाज बाद केले होते. त्याशिवाय १९७८च्या ऑस्ट्रेलियातील कसोटी विजयातही त्यांची मुख्य भूमिका होती. त्यांनी मेलबर्न कसोटीत १०४ धावा देताना १२ विकेट्स घेतल्या होत्या.
 

Web Title: Former India Spinner BS Chandrasekhar Admitted to Hospital in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.