Forgetting the death of his mother, the 'cricketer' is all set to make his debut | आईच्या निधनाचे दु:ख विसरून 'हा' क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी झाला सज्ज
आईच्या निधनाचे दु:ख विसरून 'हा' क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी झाला सज्ज

मुंबई : जेव्हा आपल्या जवळची व्यक्तीचे निधन होते, तेव्हा त्यामधून मानसीकरीत्या बाहेर पडणे सोपे नसते. पण आईच्या निधनानंतर एक क्रिकेटपटू दु:ख विसरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

या क्रिकेटपटू सध्या १६ वर्षांचा आहे. त्यामुळे या सामन्यात त्याने पदार्पण केले तर तो भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी बरोबरी करू शकतो. कारण सचिनेही १६ वर्षा वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या १९९९ साली झालेल्या विश्वचषकात सचिनच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यावेळी विश्वचषक सोडून सचिन मुंबईमध्ये आला होता. पण त्यानंतर पुन्हा विश्वचषकात तो परतला आणि केनियाविरुद्ध त्याने शतक झळकावले होते. हे शतक सचिनने आपल्या वडिलांना समर्पित केले होते.

पाकिस्तानचा युवा क्रिकेटपटू नसीम शाहच्या आईचे आठवड्याभरापूर्वी निधन झाले. पण आता तो संघाबरोबर आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. नसीम शाह हा वेगवान गोलंदाज आगे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियामध्ये संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे. जर नसीमला संधी मिळाली तर तो १६ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो.

Web Title: Forgetting the death of his mother, the 'cricketer' is all set to make his debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.