करो वा मरो सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज तुषार देशपांडे यानं पहिल्याच चेंडूंवर CSKला धक्का दिला. सॅम कुरननं पहिलाच चेंडू सीमापार टोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु अॅनरीच नॉर्ट्झेनं तो झेल टिपला. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी CSKला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावा जोडल्या. फॅफनं यदाच्या मोसमातील चौथे अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं ३९ चेंडूंत ५० धावा केल्या, पण पुढच्याच चेंडूवर वॉटसन त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. नॉर्ट्झेनं ३६ धावा करणाऱ्या वॉटसनला बाद केले.
चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
सुरेश रैना - ४५२७
महेंद्रसिंग धोनी - ३९९१
फॅफ ड्यू प्लेसिस - २०००*
माईक हसी - १७६८
कागिसो रबाडानं CSKला मोठा धक्का दिला. १५ व्या षटकात रबाडानं अर्धशतकवीर फॅफला बाद केले. फॅफनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५८ धावा केल्या. रबाडाची ही IPL मधील ५०वी विकेट ठरली. आयपीएलमध्ये सर्वात जलद ५० विकेट घेण्याचा विक्रम रबाडानं नावावर केला. त्यानं २७ सामन्यांत विकेट्सचे अर्धशतक साजरे केले.
सर्वात जलद विकेटचे अर्धशतक
२७ सामने - कागिसो रबाडा
३२ सामने - सुनील नरीन
३३ सामने - लसिथ मलिंगा
३५ सामने - इम्रान ताहीर
३६ सामने - मिचेल मॅक्लेघन
कमी चेंडूंत ५० विकेट्स घेणारे गोलंदाज
६१६ चेंडू - कागिसो रबाडा
७४९ चेंडू - लसिथ मलिंगा
७६० चेंडू - सुनील नरीन
७६० चेंडू - इम्रान ताहीर
७९७ चेंडू - मोहित शर्मा