Expert Analysis - Wow! Good luck, had fun | एक्स्पर्ट अ‍ॅनालिसीस - वाह! शुभमान, मजा आली

एक्स्पर्ट अ‍ॅनालिसीस - वाह! शुभमान, मजा आली

दुबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर केकेआरचा युवा प्रतिभावान सलामीवीर शुभमान गिलचे प्रशंसक असल्याचे मानले जाते. वेळोवेळी त्यांनी या युवा खेळाडूच्या कामगिरीची प्रशंसा केलेली आहे. केकेआरचे नेतृत्व शुभमानकडे सोपविण्यात यावे, असेही गावस्कर यांनी म्हटले होते.
गुरुवारी रात्री या युवा सलामीवीर फलंदाजाने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुन्हा एकदा शानदार खेळी केली, पण त्याचे अर्धशतक केवळ ३ धावांनी हुकले. त्याने ३४ चेंडूंना सामोरे जाताना ४७ धावा केल्या, पण त्याची फलंदाजी छाप सोडणारी होती.

गावस्कर यांनी शुभमानने अंकित राजपूतच्या गोलंदाजीवर ठोकलेल्या षटकाराचा उल्लेख केला. समालोचन करताना गावस्कर म्हणाले, ‘काय फटका होता, मजा आली. डोके सरळ रेषेत ठेवताना या युवा फलंदाजाने गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेषेपार पोहचविले. हा फटका वारंवार बघायला आवडेल. त्यामुळेच मी त्याचा फॅन आहे.‘

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Expert Analysis - Wow! Good luck, had fun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.