T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री

भारतात सध्या आयपीएलचा सतरावा हंगाम खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 03:29 PM2024-04-30T15:29:00+5:302024-04-30T15:29:07+5:30

whatsapp join usJoin us
England's provisional T20 World Cup squad announced and england players unavaliable for ipl 2024 playoffs | T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री

T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England's T20 World Cup squad: भारतात सध्या आयपीएलचा सतरावा हंगाम खेळवला जात आहे. आयपीएल २०२४ चा थरार संपताच जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. अशातच इंग्लंड क्रिकेट बोर्ड देखील विश्वचषकाच्या तयारीला लागले असून, आपला संघ जाहीर  केला आहे. तसेच इंग्लिश खेळाडू आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये खेळणार नाहीत. एकूणच ते मायदेशी परतणार आहेत. 

मागील एका महिन्यापासून आयपीएल खेळत असलेले इंग्लिश खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत. यासाठी त्यांनी आयपीएलच्या अखेरच्या सामन्यांमधून माघार घेतली आहे. इंग्लंडनेजोस बटलरच्या नेतृत्वातील आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लिश संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची एन्ट्री झाली आहे. 

इंग्लंडचा संघ जाहीर -

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, जॉनी बेयरस्टो, लिम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, आदिल राशिद, सॅम करन, फिल साल्ट, बेन डकेट, रीस टॉपली, टॉम हार्टली, मार्क वुड. 

ट्वेंटी-२० विश्वचषकात एका ट्रॉफीसाठी २० संघ मैदानात असणार आहेत. यावेळी काही नवख्या संघांना विश्वचषकाचे तिकीट मिळाले आहे. २० संघांचे चार गटात विभाजन करण्यात आले आहे. 

विश्वचषकापूर्वी पाकिस्तानशी सामना 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकासाठी जाहीर झालेला संघ मोठ्या व्यासपीठावर खेळण्यापूर्वी पाकिस्तानविरूद्धची मालिका खेळेल. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात चार ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे, २२ मे पासून ही मालिका खेळवली जाईल. वेगवान गोलंदाज आर्चरचे पुनरागमन झाले असून, त्याने मार्च २०२३ मध्ये शेवटच्या वेळी आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - 
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - 

अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

Web Title: England's provisional T20 World Cup squad announced and england players unavaliable for ipl 2024 playoffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.