ENG vs PAK : इंग्लंडनं वन डे पाठोपाठ ट्वेंटी-20तही पाकिस्तानची जिरवली अन् स्टेडियमवर रंगला इश्काचा खेळ, Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:06 PM2021-07-21T16:06:38+5:302021-07-21T16:06:59+5:30

यजमान इंग्लंडनं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवून मालिका 2-1 नं खिशात घातली.

England won T20I series by 2-1 against Pakistan, She said "Yes". Another proposal in Cricket ground, Watch Video | ENG vs PAK : इंग्लंडनं वन डे पाठोपाठ ट्वेंटी-20तही पाकिस्तानची जिरवली अन् स्टेडियमवर रंगला इश्काचा खेळ, Video 

ENG vs PAK : इंग्लंडनं वन डे पाठोपाठ ट्वेंटी-20तही पाकिस्तानची जिरवली अन् स्टेडियमवर रंगला इश्काचा खेळ, Video 

Next

England beat Pakistan by 3 wickets (with 2 balls remaining) in third T20I : यजमान इंग्लंडनं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवून मालिका 2-1 नं खिशात घातली. पाकिस्ताननं ठेवलेल्या 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला संघर्ष करावा लागला. पण, इंग्लंडनं तीन विकेट्स व दोन चेंडू राखून हा सामना जिंकला. या सामन्यात पाकिस्तानची नाचक्की होत असताना स्टेडियमवर प्रेमाला बहर आल्याचे पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान इंग्लंडच्या एका फॅननं महिलेला प्रपोज केलं अन् तिनं लगेच होकार दिला. सध्या सामन्यापेक्षा या व्हिडीओचीच चर्चा अधिक आहे.

टीम इंडियाकडून पराभवानंतर मिकी ऑर्थर यांचा चढला पारा, मैदानावर कर्णधारासोबत केलं भांडण, Video Viral

प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिझवान यानं 57 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. त्याला फखर जमान ( 24) वगळता अन्य फलंदाजांकडून साजेशी साथ मिळाली नाही आणि त्यामुळे पाकिस्तानला 6 बाद 154 धावांपर्यंत मजल मारता आली. आदील रशीदनं 35 धावांत 4 विकेट्स घेत पाकिस्तानला मोठा हादरा दिला. प्रत्युत्तरात जेसन रॉयनं 36 चेंडूंत 12 चौकार व 1 षटकारांसह 64 धावा चोपल्या. डेवीड मलान ( 31) व जोस बटलर ( 21) यांनी साथ दिली, परंतु मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशानं सामना चुरशीचा झाला. कर्णधार इयॉन मॉर्गनने 21 धावा केल्या. पण, अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. ख्रिस जॉर्डननं विजयासाठीच्या चार धावा काढल्या.

Web Title: England won T20I series by 2-1 against Pakistan, She said "Yes". Another proposal in Cricket ground, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app