इंग्लंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; तीन गडी राखून मात

इंग्लंडची मालिकेत १-० ने आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 11:44 PM2020-08-08T23:44:04+5:302020-08-09T06:52:56+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan 2020 Chris Woakes Jos Buttler Snatch Win From Jaws of Defeat | इंग्लंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; तीन गडी राखून मात

इंग्लंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; तीन गडी राखून मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मॅन्चेस्टर : वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या १२० चेंडूतील नाबाद ८४ आणि यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटलरच्या (७५) शानदार अर्धशतकांमुळे अत्यंत रोमहर्षक आणि तेवढ्याच उत्कंठापूर्ण ठरलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने चौथ्या दिवशीच शनिवारी पाकिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानचा दुसरा डाव कोलमडल्याने त्यांना सामन्यावरील पकड गमवावी लागली. विजयाचे हिरो बटलर-वोक्स यांनी व्यावसायिक वृत्तीचा परिचय देत सहाव्या गड्यासाठी १३९ धावांची दमदार भागीदारी केली. त्याआधी पाक गोलंदाजांनी इंग्लंडचा अर्धा संघ १२५ धावात गारद करीत सामना आपल्याकडे झुकवला होता. तथापि बटलर-वोक्स यांनी गोलंदाजांना कुठलीही संधी न देता वेगवान धावा काढल्या. इंग्लंडने ८२.१ षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव : ३२६ इंग्लंड पहिला डाव : २१९, पाकिस्तान दुसरा डाव : ४६.४
षटकात सर्वबाद १६९ धावा. इंग्लंड दुसरा डाव (विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य) : ८२.१ षटकात ७ बाद २७७ (वोक्स नाबाद ८४, जोस बटलर ७५, ज्यो रुट ४२, डोम सिबले ३६). गोलंदाजी: यासिर शाह ४/९९, मोहम्मद अब्बास १/३६, शाहीन आफ्रिदी १/६१, नसीम शाह १/४५.

Web Title: England vs Pakistan 2020 Chris Woakes Jos Buttler Snatch Win From Jaws of Defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.