England vs Ireland 2nd ODI: Adil Rashid is the first England spinner to take 150 ODI wickets | England vs Ireland 2nd ODI: आदील रशीदनं मिळवला मान; इंग्लंडकडून विक्रम नोंदवणारा पहिलाच फिरकीपटू

England vs Ireland 2nd ODI: आदील रशीदनं मिळवला मान; इंग्लंडकडून विक्रम नोंदवणारा पहिलाच फिरकीपटू

England vs Ireland 2nd ODI: इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यातही इंग्लंडची बाजू वरचढ दिसत आहे. नाणेफेक जिंकून आयर्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यातील अपयशानंतर आयर्लंडच्या आघाडीच्या फळीकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती, परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्यांना यश मिळवू दिले नाही. पहिल्या सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या डेव्हीड विलीनं इंग्लंडला विकेटचे खाते उघडून दिले. त्यानंतर फिरकीपटू आदील रशीदनं आयर्लंडला धक्के देताना विक्रमाला गवसणी घातली.


पाचव्या षटकात विलीनं आयर्लंडचा सलामीवीर गॅरेथ डेनली ( 0) याला माघारी पाठवले. त्यानंतर पॉल स्ट्रीलिंगला ( 12) बाद करून विलीनं आयर्लंडला मोठा धक्का दिला. जेम्स व्हिन्सनं आयर्लंडचा कर्णधार अँडी बॅलबीर्नी ( 15) ची विकेट घेतली. त्यानंतर रशीदनं आयर्लंडला तीन धक्के दिले. हॅरी टेक्टरची विकेट घेऊन रशीदनं नावावर विक्रम नोंदवला. रशीदनं 10 षटकांत 34 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून वन डे क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणारा तो पहिलाच फिरकीपटू ठरला. आयर्लंडच्या 39 षटकांत 6 बाद 139 धावा झाल्या होत्या.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल

पाकिस्तानी खेळाडूंनी इंग्लंडमध्ये साजरी केली ईद; फॅन्सनी विचारलं मास्क कुठेय? 

यूएई सुरक्षित नाही, IPL 2020 भारतातच खेळवा; सौरव गांगुलीकडे कुणी केली मागणी? 

दंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद!

IPL 2020साठी विराट कोहली तयारीला लागला, शेअर केला फोटो

 

English summary :
Adil Rashid as become the 5th England Bowler & 1st England Spinner to take 150 or more Wickets in ODIs

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: England vs Ireland 2nd ODI: Adil Rashid is the first England spinner to take 150 ODI wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.