'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली

शतकी खेळीनंतर जेमी स्मिथ नितीश कुमार रेड्डीच्या जाळ्यात अडकलाच होता. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 20:25 IST2025-07-04T20:23:14+5:302025-07-04T20:25:16+5:30

whatsapp join usJoin us
England vs India 2nd Test Rishabh Pant Dropped Jamie Smith On 121 Runs | 'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली

'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ENG vs IND 2nd Test Rishabh Pant Dropped Jamie Smith : भारत-इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धा संघ स्वस्तात तंबूत परल्यावर इंग्लंडच्या संघाने पलटवार केल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्याच सत्रात टीम इंडियाने इंग्लंडची अवस्था ५ बाद ८४ धावा अशी केली होती. पण जेमी स्मिथ अन् हॅरी ब्रूक जोडी जमली. या दोघांनी द्विशतकी खेळी करत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले. ही जोडी कोण फोडणार? असा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी काही संधी निर्माण केल्या. पण पुन्हा एकदा कॅच सुटले अन् सेट झालेल्या जोडीला आपली खेळी बहण्याची संधी मिळाली. शतकी खेळीनंतर जेमी स्मिथ नितीश कुमार रेड्डीच्या जाळ्यात अडकलाच होता. पण विकेटमागे पंतनं कॅचची संधी गमावली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 पंतनं कॅचची संधी सोडली अन् जेमी स्मिथची खेळी आणखी बहरली

अवघ्या ८४ धावांवर अर्धा संघ तंबूत परतल्यावर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ याच्या भात्यातून शतकी खेळी आली. पहिल्या डावातील ५३ षटकात इंग्लंडच्या संघाने धावफलकावर २७९ धावा लावल्या. दोन्ही फलंदाज शतकी खेळीसह मैदानात होते. ५४ व्या षटकात शुबमन गिलनं चेडू अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या हाती सोपवला. या सामन्यातील दुसरे षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर त्याने जेमी स्मिथला आपल्या जाळ्यात अडकवले. पण विकेट मागे पंत कॅच कॅरी करण्यात अपयशी ठरला.  कॅचची संधी सुटली अन् इंग्लंडसह जेमी स्मिथच्या खात्यात आणखी ४ धावा जमा झाल्या. १२१ धावांवर मिळालेल्या संधीच सोन करताना जेमीनं आपली खेळी आणखी बरदार केली.

स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

हॅरी ब्रूकला शतकाआधी मिळाली संधी

इंग्लंडच्या डावातील ३७ व्या षटकात हॅरी ब्रूकच्या विकेटची ही एक संधी निर्माण झाली होती. जडेजाच्या गोलंदाजीवर तो पहिल्या स्लिपमध्ये फसता फसता वाचला.ब्रूकच्या बॅटची कड घेऊन आलेल्या चेंडूचा अंदाज घेण्यात शुबमन गिल कमी पडला. परिणामी त्याला एक संधी मिळाली. मग त्यानंही शतकी खेळी साकारली.

Web Title: England vs India 2nd Test Rishabh Pant Dropped Jamie Smith On 121 Runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.