Sai Sudharsan Duck In Maiden Test आयपीएल स्पर्धेत शुबमन गिलच्या जोडीनं मैफिल लुटणाऱ्या साई सुदर्शन याला इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्याच सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. लोकेश राहुल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर तंबूत परतल्यावर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण चार चेंडूतच त्याचा खेळ खल्लास झाला. IPL मध्ये गुजरात फ्रँचायझी संघासाठी हिरो ठरलेला हा युवा फलंदाज पदार्पणाच्या कसोटी सामन्यात खातेही उघडू शकला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१४ वर्षांत कसोटी पदार्पणात शून्यावर बाद होणारा पहिला फलंदाज
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बेजबाबदार फटका खेळण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. मागील १४ वर्षांत पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद होणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. याआधी २०११ मध्ये उमेश यादव कसोटी पदार्पणा शून्यावर बाद झाला होता.
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
केएल राहुलची विकेट पडल्यावर मैदानात आला, अन् शून्यावर बाद होऊन परतला
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल या सलामी जोडीनं टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या सत्रातील खेळ संपण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी असताना लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. ९१ धावांवर भारतीय संघाने त्याची विकेट गमावली. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात आला. पण पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याच्या पदरी भोपळा पडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होणारा तो भारताचा २९ वा खेळाडू ठरला आहे.
कसोटी पदार्पणात शून्यावर बाद होणारे भारतीय
- सीटी सरवटे- १९४६
- जेके इराणी - १९४७
- एसए बॅनर्जी- १९४८
- गुलाम अहमद - १९४८
- एसपी गुप्ते - १९५१
- जीएस रामचंद - १९५२
- जेएम पटेल - १९५५
- एम एस हर्डीकर- १९५८
- व्हीएम मुद्दिया - १९५९
- एमएम सूद - १९६०
- बीएस चंद्रशेखर - १९६४
- यूएन कुलकर्णी - १९६७
- ईडी सोलकर -१९६९
- जीआर विश्वनाथ - १९६९
- डीडी पर्साणा - १९७९
- के श्रीकांत-१९८१
- मनिंदर सिंग - १९८२
- आरजीएम पटेल - १९८८
- व्ही राझदान -१९८९
- कुरुविला - १९९७
- आर सिंग-१९९९
- डीजे गांधी - १९९९
- आर विजय भारद्वाज - १९९९
- एक रात्र - २००२
- पीए पटेल - २००२
- डब्ल्यूपी साहा - २०१०
- आर. अश्विन -२०११
- उमेश यादव - २०११
- बी साई सुदर्शन – २०२५
Web Title: England vs India 1st Test Sai Sudharsan First Indian Batter In 14 Years To Bag Duck In Début Test Knock
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.