T20 World Cup 2021, England Squad: इंग्लंडचे शिलेदार जग जिंकायला सज्ज! टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा; मॉर्गनकडे धुरा

T20 World Cup 2021, England Squad: भारतीय संघापाठोपाठ आता इंग्लंड क्रिकेट बोर्डानंही टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या संभाव्य १५ जणांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 04:12 PM2021-09-09T16:12:30+5:302021-09-09T16:13:16+5:30

whatsapp join usJoin us
England Men name preliminary squad for the ICC Men T20 World Cup 2021 | T20 World Cup 2021, England Squad: इंग्लंडचे शिलेदार जग जिंकायला सज्ज! टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा; मॉर्गनकडे धुरा

T20 World Cup 2021, England Squad: इंग्लंडचे शिलेदार जग जिंकायला सज्ज! टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा; मॉर्गनकडे धुरा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2021, England Squad: टी-२० विश्वचषक स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. भारताच्या संभाव्य क्रिकेट संघाची घोषणा बीसीसीआयनं केल्यानंतर आता इतर देशांच्या क्रिकेट बोर्डाकडूनही 'मिशन टी-२०' साठी संभाव्य संघाची घोषणा केली जाऊ लागली आहे. भारतीय संघापाठोपाठ आता इंग्लंड क्रिकेट बोर्डानंही टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या संभाव्य १५ जणांच्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. (England Men name preliminary squad for the ICC Men's T20 World Cup 2021)

टी-२० विश्वचषकासाठी बांगालादेशचा संघ जाहीर, या अष्टपैलूकडे सोपवली नेतृत्वाची धुरा

इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानं पुन्हा एकदा इऑन मार्गनच्या पाठिशी उभं राहत संघाची धुरा त्याच्याकडे सोपवली आहे. तर वेगवान गोलंदाज टायमल मिल्स याचं संघात पुनरागमन झालं आहे. टी-२० लीग स्पर्धांमध्ये मिल्सनं दाखवलेल्या दमदार कामगिरीचं बक्षिस त्याला मिळाल आहे. दरम्यान, बेन स्टोक्सनं मानसिक स्वास्थ्याचं कारण देऊन क्रिकेटपासून काहीकाळ दुरावा घेतल्यानं इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी देखील उपलब्ध नाही. याचा मोठा फटका संघाला बसण्याची शक्यता आहे. 

...म्हणून टी-२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंग धोनीकडे सोपवली गेली टीम इंडियाच्या मेंटॉरपदाची जबाबदारी, समोर आलं मोठं कारण 

असा आहे इंग्लंडचा संभाव्य १५ खेळाडूंचा संघ
इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेअरस्टो,  जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, टायमल मिल्स, आदिल रशिद, जेसन रॉय, डेव्हिड विले, ख्रिस वोक्स, मार्क वूड

Web Title: England Men name preliminary squad for the ICC Men T20 World Cup 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.