This England batsman is playing the highest innings every time, know how | इंग्लंडचा 'हा' फलंदाज दरवेळी करतोय सर्वोच्च खेळी, जाणून घ्या कशी
इंग्लंडचा 'हा' फलंदाज दरवेळी करतोय सर्वोच्च खेळी, जाणून घ्या कशी

- ललित झांबरे

इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली हा पुढच्या डावात नक्कीच 66 पेक्षा अधिक धावा करेल. आता ही भविष्यवाणी कशी काय? तर आतापर्यंत त्याने पाच डाव खेळले आहेत आणि प्रत्येक डावात त्याने गेल्या डावापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. म्हणजे कसोटी सामन्यात ज्या ज्या वेळी तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्या प्रत्येक वेळी त्याने आपली नवी सर्वोच्च खेळी नोंदवली आहे. 

त्याच्या पहिल्या पाच डावांतील खेळी बघा...1, 4, 25, 44 आणि 66. प्रत्येक वेळी आधीच्या डावापेक्षा अधिकच धावा त्याने केल्या आहेत आणि पहिल्या ओळीने पाच डावात असा चढता क्रम राखणारा तो इंग्लंडचा पाचवा फलंदाज आहे. इंग्लंडसाठी ओळीने पाच डावात सर्वोच्च खेळीचा क्रम राखणारे आधी चार फलंदाज होऊन गेले आहेत . पण ते तब्बल 90 वर्षांपूर्वी.  त्यानंतर हा क्रम राखणारा क्रॉली हा पहिलाच. इंग्लंडचे हे फलंदाज आणि त्यांचे डाव बघू या..

डावफलंदाजधावाकालावधी
5जी. मॅकग्रेगर0, 1, 2, 9, 161890-92
5एफ.एल.फेन1, 3, 8, 65, 1431906
5एच. लारवूड0, 5, 17, 32, 701926-28
5इयान पीबल्स2, 3, 6, 18, 261927-28
5झॕक क्रॉली 1, 4, 25, 44, 662019-20

 

टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजाची न्यूझीलंड दौऱ्यातून माघार!

IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम

...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान

बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान

IND vs NZ : जसप्रीत बुमराहला दुखापत, टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात बसू शकतो धक्का?

BCCIनं सेंट्रल काँट्रॅक्ट नाकारलं, पण उत्पन्नाची 'हे' सात स्रोत धोनीला करतात मालामाल

Video: डिव्हिलियर्सची चौकार-षटकारांची आतषबाजी, 191.89 च्या स्ट्राईक रेटनं धु धु धुतले

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला इशारा, टीम इंडिया आशिया कपमध्ये न खेळल्यास...

Video : RCBच्या नव्या भिडूनं शतकी खेळीनंतरही सामना गमावला, पाहा नेमकं काय झालं

Web Title: This England batsman is playing the highest innings every time, know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.